वृत्तसंस्था/ कोलकाता
गतविजेते कोलकाता नाईट रायडर्स आणि गेल्या हंगामात अंतिम फेरे पोहोचलेले सनरायझर्स हैदराबाद हे संघ गेल्या तीनपैकी दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करल्यामुळे अडचणीत सापडले आहेत आणि गुऊवारी आयपीएलमध्ये जेव्हा ते एकमेकांसमोर येतील तेव्हा दोन्ही संघ त्यांच्या मोहिमांना पुन्हा रुळावर आणण्यास उत्सुक असतील.
केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने हंगामाच्या सुऊवातीच्या सामन्यातील रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरविऊद्धच्या दाऊण पराभवानंतर संघासंदर्भातील चिंतांना फारसे महत्त्व दिले नव्हते आणि घाबरण्याची गरज नाही असे सांगितले होते. तथापि, तीन सामन्यांमध्ये दोन पराभवांमुळे केकेआरच्या गोटातील वातावरण थोडे बदलले आहे. केकेआरचा आरसीबीविऊद्ध सात गड्यांनी पराभव झाल्यानंतर चर्चेत आलेल्या ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर आता लक्ष केंद्रीत झाले आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनवर सुनील नरेन, मोईन अली आणि वऊण चक्रवर्ती यांचा समावेश असलेल्या केकेआरच्या फिरकी गोलंदाजांना मदत करणारी खेळपट्टी तयार करण्याचा दबाव आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयात प्रभावी कामगिरी केलेल्या चक्रवर्तीला आरसीबीविऊद्ध पाटा खेळपट्टीवर संघर्ष करावा लागला आणि त्याने प्रति षटक 10.75 धावा दिल्या. वृत्तांनुसार, ईडन गार्डन्सचे पिच क्युरेटर सुजन मुखर्जी यांनी पहिल्या सामन्यात केकेआरची फिरकीस अनुकूल खेळपट्टी बनविण्याची विनंती नाकारली होती. हा निर्णय संघाच्या अंगलट येऊन त्यांच्या प्रमुख फिरकीपटूंपैकी एक असलेल्या चक्रवर्तीने त्या सामन्यात 45 धावा दिल्या. मुखर्जी यांनी त्यांच्या भूमिकेचा बचाव केला असला, तरी सीएबीचे अध्यक्ष स्नेहशिष गांगुली यांनी तेव्हापासून क्युरेटरसोबत खेळपट्टीवर नजर ठेवली आहे. त्यामुळे केकेआरच्या आगामी घरच्या सामन्यांच्या बाबतीत दृष्टिकोनात बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
केकेआरच्या संघ रचनाने मेगा लिलावानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या फलंदाजी आणि गोलंदाजी विभागांमध्ये समन्वय नसल्याचे दिसून आले आहे आणि प्रमुख खेळाडू कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत. उल्लेखनीय म्हणजे लिलावापूर्वी केकेआरने चार खेळाडू सोडले होते. माजी कर्णधार श्रेयस अय्यर (पीबीकेएस), उपकर्णधार नितीश राणा (राजस्थान रॉयल्स), फिल सॉल्ट (आरसीबी) आणि वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क (दिल्ली कॅपिटल्स) या त्या चारही खेळाडूंनी आयपीएलच्या पहिल्या 10 दिवसांत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
स्टार्कच्या जाण्याने केकेआरला विशेषत: धक्का बसला आहे, कारण त्याच्या अनुपस्थितीत त्यांचा वेगवान मारा कमकुवत दिसत आहे. स्टार्कच्या जागी संघात आणलेला ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सन प्रभावित करण्यात अपयशी ठरला आहे, तर अॅनरिच नॉर्टजे पाठीच्या दुखापतीमुळे बाजूला पडला आहे. केकेआरने भरपूर पैसे मोजून पुन्हा आणलेला खेळाडू वेंकटेश अय्यरने दोन डावांत फक्त नऊ धावा केल्या आहेत, ज्यामुळे संघासमोरचे संकट वाढले आहे. राखून ठेवलेल्या खेळाडूंपैकी रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, हर्षित राणा आणि रमणदीप सिंग यांनही संघर्ष करावा लागला आहे.
दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादने त्यांच्या हंगामाच्या पहिल्या सामन्यात 6 बाद 286 धावा काढल्यानंतर गेल्या दोन सामन्यांत 200 धावांचा टप्पाही ओलांडता आलेला नाही. त्यांच्या अतिआक्रमक फलंदाजीच्या दृष्टिकोनामुळे लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्सविऊद्ध त्यांना पराभव पत्करावा लागला. गेल्या हंगामातील आयपीएलच्या अंतिम सामन्यातील पराभवाचा बदला घेण्यासाठी पॅट कमिन्सच्या संघाला आता रणनीतीचा आढावा घ्यावा लागेल. कमिन्स आणि मोहम्मद शम्मी ही वेगवान जोडी ईडन गार्डन्सवर धोका निर्माण करू शकते.
संघ-कोलकाता नाईट रायडर्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, क्विंटन डी कॉक, रहमानउल्ला गुरबाज, अंगक्रिश रघुवंशी, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, लवनीथ सिसोदिया, वेंकटेश अय्यर, अनुकुल रॉय, मोईन अली, रमणदीप सिंग, आंद्रे रसेल, एनरिक नॉर्टजे, वैभव अरोरा, मयंक मार्कंडे, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, सुनील नरेन, वऊण चक्रवर्ती आणि चेतन साकरिया.
सनरायझर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), इशान किशन, अथर्व तायडे, अभिनव मनोहर, अनिकेत वर्मा, सचिन बेबी, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, हर्षल पटेल, कामिंदू मेंडिस, विआन मुल्डर, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रे•ाr, मोहम्मद शमी, राहुल चाहर, अॅडम झॅम्पा, सिमरजित सिंग, झीशान अन्सारी, जयदेव उनाडकट आणि इशान मलिंगा.
सामन्याची वेळ : संध्या. 7:30 वा.









