राणा दग्गुबातीकडून निर्मिती
पिंजर या चित्रपटानंतर मनोज वाजपेयी अभिनेता फ्रँक लँगेलासोबत एका आंतरराष्ट्रीय चित्रपटात काम करणार होते, परंतु हा प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकला नव्हता. दोन दशकांपेक्षा अधिक काळानंतर मनोज वाजपेयींनी स्वत:च्या फिल्मोग्राफीत एक इंडो-अमेरिकन चित्रपट जोडला आहे. मनोज आता अमेरिकन चित्रपट निर्मात्या बेन रेखी यांच्याकडून दिग्दर्शित एका चित्रपटात काम करणार आहे.
या चित्रपटाची निर्मिती राणा दग्गुबातीचे प्रॉडक्शन हाउस स्पिरिट मीडियाने केली आहे. मनोजचा हा पहिला इंडो-अमेरिकन चित्रपट असणार आहे. बेन रेखी यांनीच याची कहाणी लिहिली आहे. चित्रपटाची कहाणी परिवाराच्या यात्रेच्या माध्यमातून सामाजिक मुद्द्याला स्पर्श करणार आहे. या चित्रपटात मुंबईतील कलाकारांना स्थान देण्यात आले आहे.
या चित्रपटात मनोज एका सामान्य माणसाची भूमिका साकारत आहे, ज्याचा परिवार संकटात सापडतो आणि त्याला एका मुद्द्यासाठी लढावे लागते. या चित्रपटाला लवकरच प्रदर्शित केले जाणार असल्याचे निर्मात्यांकडून सांगण्यात आले.









