निर्देशांक 1,400 अंकांची घसरण, निफ्टीची
वृत्तसंस्था / मुंबई
आज बुधवारीं भारतीय प्रमाणवेळेनुसार साधारणत: मध्यरात्री अमेरिकेचे नवे रेसिप्रोकर कर धोरण घोषित होणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील शेअरबाजारांमध्ये मोठी पडझड पहावयास मिळाली आहे. मुंबई शेअरबाजाराचा सूचकांक मंगळवारी कामकाजाची वेळ संपल्यानंतर 1,400 हून अधिक अंकांनी कमी झाला आहे. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशी सूचकांक निफ्टीमध्ये 342.10 ची घट झाली आहे. हे प्रमाण साधाणत: दीड टक्का आहे. यामुळे अनेक गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. विशेषत: ज्यांनी गेल्या दोन आठवड्यांमध्ये ज्यांनी मोठ्या प्रमाणात समभाग खरेदी केली आहे, त्यांची हानी मोठी झाली आहे. जगातील सर्व शेअरबाजारांची आज हीच अवस्था झाली आहे.
अमेरिकडून रेसिप्रोकल कर लागू झाल्यानंतर भारताची त्या देशाला होणारी निर्यात दबावाखाली येऊ शकते. या विचाराने पोलाद, माहिती तंत्रज्ञान, अन्नपदार्थ आदींची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे समभाग घसरले आहेत. असे असले तरी भारताने अन्य विकसीत देशांच्या तुलनेत या परिस्थितीशी चांगले दोन हात केले आहेत. युरोपियन महासंघ, जपान, चीन, कॅनडा आदी देशांच्या शेअरबाजारांमध्ये जी प्रचंड अस्थिरता पसरली आहे, तेव्हढी भारताच्या शेअरबाजारांमाध्ये नाही. हा टप्पा पार पडल्यानंतर भारतीय शेअरबाजार पुन्हा वरचढ होणार यात शंका नाही, असे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले आहे. अमेरिकेचे रेसिप्रोकल कर धोरण लागू झाल्यानंतर काही काळ शेअरबाजारांमध्ये चिंतेचे वातावरण राहील. मात्र पंधरा दिवस ते एक महिन्याच्या काळात सारे काही स्थिरावेल आणि भारतीय शेअर बाजार पुन्हा उसळी घेऊ शकतात. त्यामुळे गुंतवणूकदारांनी पॅनिकमध्ये न येता स्थितीचा अभ्यास करावा. तसेच घाईगडबडीने निर्णय घेऊ नयेत. काही दिवस प्रतीक्षा करुन नंतर योग्य तो निर्णय घ्यावा, असे आवाहन तज्ञांनी केले आहे. विशेषत: ज्यांना समभाग विकायवयाचे आहेत, त्यांनी विचारपूर्वक आणि संयमाने निर्णय घ्यावा. शेअरबाजार पुन्हा पूर्वस्थितीला येऊ शकतो, ही धारणा असावी. घाईने विक्री करणाऱ्यांची संख्या वाढल्यास शेअरबाजार आणखी खाली येऊ शकतात.. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय व्यावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.









