विशाखापट्टणम :
भारत आणि अमेरिकेचे नौदल एका युद्धाभ्यासात सामील झाले आहे. हा युद्धाभ्यास बंगालच्या उपसागरात होत असून याचे नाव ‘टायगर ट्रायम्फ’ ठेवण्यात आले आहे. या युद्धाभ्यासाचा उद्देश संकटाच्या स्थितीत दोन्ही देशांच्या नौदलांदरम्यान ताळमेळ वाढविणे आहे. दोन आठवड्यांपर्यंत चालणाऱ्या या युद्धाभ्यासात दोन्ही देश मिळून मोहिमेचा संयुक्त सराव करणार आहेत. टायगर ट्रायम्फ युद्धाभ्यास दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. पहिला टप्पा विशाखापट्टणममध्ये पार पाडला जात असून याला हार्बर फेज म्हटले जात आहे.









