पतियाळा
पंजाबच्या पतियाळा जिल्ह्यातील बादशाहपूर पोलीस स्थानकानजीक स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे पोलीस स्थानकाचे किरकोळ नुकसान झाले आहे. पोलीस स्थानकानजीक नागरी वस्ती नसल्याने जीवितहानी टळली आहे. सोमवारी रात्री उशिरा घडलेल्या या स्फोटानंतर पोलीस स्थानकानजीकच्या शेतांमध्ये शोध घेतला जात आहे. स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच स्फोट कुठे झाला हे देखील कळू शकलेले नाही. याप्रकरणी तपास केला जात असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. नानक सिंह यांनी सांगितले आहे.









