मुंबई :
इंधनामध्ये इथेनॉलचे मिश्रण 20 टक्क्यांपर्यंत करण्यात आले असल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू खात्याचे केंद्रीय मंत्री हार्दिक पुरी यांनी दिली आहे. इंधनामध्ये इथेनॉलचे प्रमाण 1.4 टक्क्याहून 20 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे. अंदमानमधील समुद्रातून इंधनासाठी 35 हजार बॅरल प्रति दिवसाला तेल उपसले जात असून ते आगामी काळात वाढवून 2 लाख 45 हजार बॅरल वर नेले जाणार आहे.









