शिराळा :
बिऊर (ता. शिराळा) येथे भांडणे सोडविण्यास गेल्याच्या कारणावरुन काठीने मारहाण केल्याप्रकरणी दीपक काशीनाथ गोसावी, (वय ३७) रा. कांदे यांनी शिराळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सदर घटना रविवारी बिऊर एसटी स्टँडजवळ गोसावी वस्तीत घडली.
दीपक गोसावी भाचा श्रीकांत मोहन गोसावी रा. बिऊर हा आजारी असल्याने त्यास बघण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्या घराशेजारी राहणारे दीपक यांची चुलत बहिण शांताबाई मोहन गोसावी व दाजी मोहन गणपती गोसावी यांच्यामध्ये घरगुती कारणावरुन वाद सुरु होता.
दीपक हा वाद सोडविणेसाठी गेले असता तू येथे आमची भांडणे का सोडविण्यासाठी आला आहेस असे म्हणून दीपकचा धाकटा भाचा अमर गोसावी याने लाथाबुक्यांनी मारहाण केली. मोहन गोसावी यांनी त्यांच्या काठी दीपकच्या डोक्यात मारुन जखमी केले. त्यानंतर भाऊ अमोल गोसावी याने अमर यास भावाला का मारहाण केली याबाबत विचारले असता अमर व मोहन गोसावी यांनी अमोल गोसावी यास मारहाण केली.








