वृत्तसंस्था / कराची
पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका येत्या मे महिन्यात खेळविली जाणार आहे. तत्पूर्वी या दोन संघामध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका निश्चित केली होती. पण ती रद्द केल्याने आता पाच सामन्यांची टी-20 मालिका होण्यास दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांनी हिरवा कंदिल दाखविला आहे.
आगामी आशिया चषय क्रिकेट स्पर्धा तसेच पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी सरावराच्या दृष्टिकोनातून ही पाच सामन्यांची टी-20 मालिका आयोजित केली आहे. या मालिकेतील सामने लाहोर, मुल्तान आणि फैसलाबाद येथे होतील, असा अंदाज आहे. मात्र अद्याप या सामन्यांची ठिकाणे निश्चित करण्यात आलेली नाहीत. या मालिकेनंतर पाकिस्तानचा संघ जून किंवा जुलै महिन्यात बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका आयोजित केली आहे.









