वृत्तसंस्था / अॅडलेट
ऑस्ट्रेलियामध्ये प्रथमश्रेणी क्रिकेट नेहमीच खेळले जाते. दरम्यान द. ऑस्ट्रेलिया संघाने तब्बल 29 वर्षानंतर ऑस्ट्रेलियातील शेफील्ड शिल्ड क्रिकेट स्पर्धा पहिल्यांदाच जिंकली आहे. या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये द. ऑस्ट्रेलिया संघाने अंतिम सामन्यात क्विन्सलँडचा 4 गड्यांनी पराभव केला.
शेफिल्ड शिल्ड स्पर्धेतील द. ऑस्ट्रेलिया आणि क्विन्सलँड यांच्यातील हा अंतिम सामना 5 दिवसांचा खेळविला गेला. पण शनिवारी द. ऑस्ट्रेलियाने चौथ्याच दिवशी क्विन्सलँडचा पराभ करुन जेतेपद पटकाविले. या अंतिम सामन्यात द. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 6 बाद 270 धावा जमवित विजय नोंदविला. द. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार जेसन सांघाने नाबाद शतक (126) तर यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरेने 105 धावा जमविल्या. या जोडीने 202 धावांची भागिदारी केली. या सामन्यात क्विन्सलँडचा पहिला डाव 95 धावांत आटोपला. त्यानंतर द. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 271 धावा जमविल्या. क्विन्सलँडने दुसऱ्या डावात 445 धावा जमवित द. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 270 धावांचे आव्हान दिले.









