वृत्तसंस्था/ चंदीगड
चंदीगडमधील उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश निर्मल यादव यांच्याशी संबंधित बहुचर्चित 15 लाख रुपयांच्या लाचेच्या नोट घोटाळा प्रकरणात सीबीआय न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष सोडले आहे. या प्रकरणातील एका आरोपीचा आधीच मृत्यू झाला आहे. माजी न्यायाधीश निर्मल यादव यांची निर्दोष मुक्तता करण्यात येत असल्याचे शनिवारी दुपारी चंदीगडमधील विशेष सीबीआय न्यायालयाच्या न्यायाधीश अलका मलिक यांनी जाहीर केले. मागील सुनावणीत रवींद्र सिंह उर्फ रवींद्र भसीन, राजीव गुप्ता आणि निर्मल सिंह यांचे अंतिम जबाब न्यायालयात नोंदवण्यात आले होते. तसेच माजी न्यायमूर्ती निर्मल यादव यांनी आपला लेखी जबाब न्यायालयात पाठवला होता.









