रत्नागिरी :
रत्नागिरीत विश्वशांतीसाठी महासत्संग सोहळ्याचे आयोजन महासत्संग सोहळा आयोजन समिती, कोकण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. हा सोहळा 1 एप्रिल रोजी सायं. 4 ते 6 या वेळेत परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचे मार्गदर्शन लाभणार असल्याचे समितीच्यावतीने पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
यासंदर्भात शुक्रवारी शहरामील साळवी स्टॉप येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी संतोष यादव, सूर्यकांत सावंत, प्रभाकर रहाटे, अरुण नाचणकर, मनोहर पारकर, मनोज करंगुटकर आदींची उपस्थिती होती. हा कार्यक्रम रत्नागिरी शहरातील नवीन ट्रक वाहनतळ, स्टेट बँक कॉलनीजवळ, साळवी स्टॉप, रत्नागिरी येथे होणार असल्याचे सांगण्यात आले. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, गोवा यासह महाराष्ट्र राज्यभरातून सुमारे 15 ते 16 हजार भक्तगणांची उपस्थिती लाभणार आहे. या महासत्संग सोहळ्यामध्ये सामूहिक श्री स्वामी चरित्र सारामृत पठण सायं. 4 ते 5 च्या वेळेत होणार आहे. तसेच श्री चक्रराज श्रीयंत्र पूजन सायं. 5 ते 6 वा. करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सायंकाळी 6 वा. परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. कोट्यावधी सेवेकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या अण्णासाहेब मोरे यों तब्बल एका तपानंतर कोकण भूमीत या कार्यक्रमानिमित्ताने आगमन होणार आहे. या पवित्र सोहळ्dयात सर्व भक्तगणांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.








