बिग बँगनंतर केवळ 30 कोटी वर्षात आकाशगंगा जेएडीईएस-जीएस-झेड14-0 ऑक्सिजन मिळाला आहे. या आकाशगंगेत ऑक्सिजनचे मोठे प्रमाण वैज्ञानिकांसाठी आश्चर्यकारक आहे, कारण हायड्रोजन आणि हेलियमशिवाय अन्य घटक इतक्या लवकर निर्माण होऊ शकत नसल्याचे वैज्ञानिकांचे मानणे हेते. ऑक्सिजनची निर्मिती ताऱ्यांच्या कोरमध्ये हायड्रोजनच्या संलयनामुळे होते. ही प्रक्रिया अत्यंत दीर्घ कालावधी घेते, जेएडीईएस-जीएस-झेड14-0 चा शोध जेम्स वेब टेलिस्कोपद्वारे 2024 मध्ये लावण्यात आला होता. याच्या प्रकाशाला पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 13.4 अब्ज वर्षे लागतात. नेदरलँड्सच्या लीडेन ऑब्जर्वेटरीचे कॉस्मोलॉजिस्ट सँडर शाउस यांनी हा प्रकार म्हणजे जेथे तुम्ही नवजातांची अपेक्षा केलेली असते, तेथे किशोरवयीन आढळतात अशा स्वरुपाचा असल्याचे म्हटले आहे. आकाशगंगा अत्यंत वेगाने निर्माण झाली असून वेगाने परिपक्व देखील होत आहे. हा प्रकार दंग करणारा असल्याचे ते म्हणाले. जेएडीईएस-जीएस-झेड14-0 चे अस्तित्व आमच्या ब्रह्मांडीय मॉडेल्ससाठी एक समस्या आहे, कारण आकाशगंगांना विकसित होण्यास अत्यंत अधिक वेळ लागतो असे आमचे मानणे आहे. ही आकाशगंगा इतकी दूर आहे की ती पाहण्यासाठी अत्यंत मोठा आणि चमकणारा प्रकाश असायला हवा. ही आकाशगंगा 13.4 अब्ज प्रकाशवर्षांच्या अंतरावर असल्याचे शाउस यांनी सांगितले.
ऑक्सिजनची निर्मिती
हायड्रोजन आणि हेलियमद्वारे अवजड घटकांच्या निर्मितीसाठी देखील दीर्घ कालावधी लागतो. जेव्हा आमच्यासारखे ब्रह्मांड बिग बँगमध्ये पहिल्यांदा अस्तित्वात आले, तेव्हा सर्व प्रथम हायड्रोजन आणि हेलियम हेच घटक निर्माण झाले. प्रथम ताऱ्यांची निर्मिती झाली आणि ते इतके तप्त झाले की त्यांनी हायड्रोजनला ऑक्सिजनसारख्या भारी घटकांमध्ये बदलले. परंतु या घटकांना अंतराळात फैलावण्यासाठी ताऱ्यांना स्वत:चे जीवन जगावे लागेल आणि एका मोठ्या विस्फोटात मृत व्हावे लागेल. ही प्रक्रिया काही दशलक्ष वर्षांमध्ये होऊ शकते. चिलीमध्ये वैज्ञानिकांनी जेव्हा जेएडीईएस-जीएस-झेड14-0 आकाशगंगेचे अध्ययन केले तेव्हा त्यांना हायड्रोजन आणि हेलियममध्ये अवजड घटकांचे प्रमाण अनुमानापेक्षा 10 पट अधिक आढळून आले. यातून या घटकांची निर्मिती अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने झाल्याचे दिसून येत असल्याचे वैज्ञानिकांनी सांगितले आहे.









