प्रतिनिधी
बांदा
होळी पौर्णिमेपासून पंधरा दिवसांनी बांद्याचा रंगपंचमी उत्सव साजरा होतो. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून दिवसभर बांद्यात सर्वत्र रंगाची उधळण सुरू होती. बुधवारी सायंकाळी पारंपारिक “सुवारीचा रोंबाट ” ही फेरी झाली. रात्री स्थानिक कलाकारांचा “एकदा पहावं करून” हा नाट्य प्रयोग झाला .गुरुवारी सकाळी बांदा बाजारपेठेतील श्री देव मांडकरी देवस्थान येथे पारंपारिक धार्मिक विधी झाल्यानंतर शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत रंगांची उधळण झाली व रंगपंचमीला आरंभ झाला. त्यानंतर दिवसभर संपूर्ण गावात जागोजागी रंगांची उधळण सुरू होती. ढोल, ताशे ,झांज या पारंपरिक वाद्यांसह डीजेच्या तालावरही नाचण्याचा आनंद जिथे तिथे घेतला जात होता. सायंकाळच्या सत्रात वाजत गाजत रोंबाट फेरी त्यानंतर होळीचा खुंट येथे प्रतिवार्षिक धार्मिक विधी आधी कार्यक्रम होते. गावात सर्वत्र लोकांनी या रंगपंचमी उत्सवाचा मनमुराद आनंद लुटला.









