सावंतवाडी । प्रतिनिधी
मराठी नवीन वर्षांच्या स्वागतानिमित्त तिरोडा (ता.सावंतवाडी) येथील श्री देव पाटेकर पंचायतन तर्फे खगोल मंडळ आकाश वेधशाळा मुंबई आयोजित आकाश दर्शन कार्यक्रम दिनांक 5 एप्रिल 2025 रोजी जि. प तिरोडा नंबर १ येथील मैदानावर संध्याकाळी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत दुर्बिणीची माहिती आणि तारकासमूहाची ओळख,दुर्बिणीतून निवडक 3,4 आकाशस्त वस्तुचे निरीक्षण, स्लाईड शो कॅसमॅसचे रहस्य , तारे ,ग्रह आणि आकाश गंगेची माहिती आणि प्रश्नोत्तरे होणार आहेत. सहभागी होण्यासाठी सर्व इच्छुक आणि इतरांनी 1 एप्रिलपर्यंत पुरूषोत्तम शेणई 9423880420 यांच्याकडे विद्यार्थी व इतरांनी नोंदणी करावी असे आवाहन सर्व श्री देव पाटेकर पंचायतन यांनी केले आहे









