रत्नागिरी :
रत्नागिरीनजीकच्या खेडशी विविध कार्यकारी सहकारी संस्थेत सचिवाने 16 लाख 45 हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आह़े संस्थेचे लेखा परीक्षक यांनी अपहार प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल केली असून त्यानुसार पोलिसांनी खेडशी सहकारी संस्थेचे सचिव संदीप दत्ताराम घवाळी (ऱा डफळचोळवाडी, खेडशी) याच्याविऊद्ध गुन्हा दाखल केल़ा
संदीप घवाळी हा खेडशी येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेत सचिव म्हणून कार्यरत होत़ा 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 या काळात संदीप याने संस्थेकडे जमा होणारी रक्कम बँक खात्यात जमा न करता रजिस्टरवर खोट्या नोंदी कऊन 16 लाख 45 हजार ऊपयांचा अपहार केला, अशी तक्रार संस्थेचे लेखा परीक्षक माधव भास्कर हिर्लेकर (64, ऱा पाडावेवाडी–मिरजोळे) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसात दाखल केल़ी त्यानुसार पोलिसांनी संदीप याच्याविऊद्ध भारतीय दंड विधान 1860 चे कलम 406, 408, 420 नुसार गुन्हा दाखल केल़ा पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून करण्यात येत आह़े








