उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचा निषेध
खानापूर : खानापूर तालुका भाजपच्यावतीने शिवस्मारक चौकात मंगळवारी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी कंत्राटी नोकऱ्यांमध्ये मुस्लिमांना 4 क्के आरक्षण देण्यात येईल व दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी वेळप्रसंगी संविधानसुद्धा बदलू, असे मत व्यक्त केले होते. या विरोधात खानापूर भाजपने डी. के. शिवकुमार यांच्या विरोधात आंदोलन करून त्यांचा निषेध व्यक्त केला. कर्नाटक सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. निर्णयाच्या निषेधार्थ डी. के. शिवकुमार यांच्या प्रतिमेचे दहनही यावेळी करण्यात आले. यावेळी मानवी साखळी करून त्यांनी काँग्रेस सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. आंदोलनामुळे काहीकाळ वाहतूक खोळंबली होती. यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष बसवराज सानिकोप्प, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, माजी आमदार अरविंद पाटील, संजय कुबल, मल्लाप्पा मारीहाळ, गुंडू तोपिनकट्टी, सुंदर कुलकर्णी, सुरेश देसाई, चेतन मणेरीकर, पंडित ओगले, किशोर हेब्बाळकर, सयाजी पाटील, प्रशांत लक्केबैलकर, संजय कंची, सदानंद होसुरकर, राजू करंबळकर, मनोहर कदम, जॉर्डन, रवी बडगेर, प्रकाश निलजकर, मोहन पाटील, राहुल अळवणी, अभिजीत बाळेकुंद्री, प्रदीप पवार, विठ्ठल निडगलकर, यशवंत गावडे, सुनीता पाटील आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.









