टेक्सास :
जागतिक स्तरावर दिग्गज कंपनी टेस्लाच्या कार विक्रीत लक्षणीयरित्या घट झाली असून या संधीचा फायदा चिनी कंपनी बीवायडीने उचलला आहे. मागच्या वर्षी 100 अब्ज डॉलर्सची कार विक्री करत बीवायडी ही कंपनी कार विक्रीत अग्रेसर राहिली आहे. अमेरिकन कंपनी टेस्ला यांना हा मोठा धक्का आहे.
इलेक्ट्रीक आणि हायब्रिड कार विक्रीत बीवायडीने लक्षणीय प्रगती साधली आहे. आधुनिक वैशिष्ट्यांसहच्या बीवायडीच्या कार्सना ग्राहकांनी मोठी पसंती दर्शवली होती. बीवायडीने 31 डिसेंबरला संपलेल्या वर्षात 777 अब्ज युआन दमदार महसुल प्राप्त केला आहे. याआधी कंपनी 766 अब्ज डॉलर्सचा महसुल प्राप्त करेल असा अंदाज बांधला गेला तर खरा ठरला आहे. सदरच्या वर्षी स्पर्धक कंपनी टेस्लाने 97.7 अब्ज डॉलर्सवर समाधान मानले. निव्वळ उत्पन्न वाढत 34 टक्के वर्षाच्या आधारावर वाढत 40.3 अब्ज युआनवर पोहचलं होतं. तज्ञांचा 39 अब्ज युआनचा अंदाजही मागे टाकण्यात कंपनीला यश आले आहे.









