बेंगळूर :
आयटी क्षेत्रातील कंपनी अॅक्सेंचरने डिसेंबर फेब्रुवारीच्या तिमाहीत 16.7 अब्ज डॉलर्सचा महसूल प्राप्त केला आहे. मागच्या तुलनेमध्ये महसुलात पाच टक्के इतकी वाढ झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. आयर्लंडमध्ये मुख्यालय असणाऱ्या या कंपनीने संपूर्ण वर्षाच्या महसुलामध्ये पाच ते सात टक्के वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. यापूर्वी महसुलामध्ये वाढीचा अंदाज चार ते सात टक्के इतका कंपनीने नोंदवला होता. अॅक्सेंचरचे आर्थिक कॅलेंडर वर्ष हे सप्टेंबर ते ऑगस्ट असे गणले जाते.









