डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम टॅलेंट सर्च परीक्षेत तालुक्यात पाचवी
न्हावेली / वार्ताहर
मळगाव येथील शारदा विद्यालय मळगाव रस्ता या जिल्हा परिषद शाळेची इयत्ता चौथीची विद्यार्थिनी तेज दत्ताराम मळगावकर हिने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम टॅलेंट सर्च परीक्षेत २४८ गुणांसह केंद्रात प्रथम तर तालुक्यात पाचवा क्रमांक प्राप्त केला आहे. तर भारत टॅलेंट सर्च (बीटीएस) परीक्षेत तालुक्यात पाचवा क्रमांक पटकावित घवघवीत यश संपादन केले आहे.डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम टॅलेंट सर्च परीक्षा व भारत टॅलेंट सर्च परीक्षा या दोन्ही परीक्षेसाठी तिला प्रशालेच्या शिक्षिका अस्मिता गोवेकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच तिचे वडील दत्ताराम मळगावकर यांचेही तिला वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. गतवर्षी झालेल्या सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षेत तेज हिने गोल्ड मेडल पटकाविले होते. शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने तिला भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार करण्यात आला. तसेच तिला दोन्ही परीक्षेत मार्गदर्शन केलेल्या अस्मिता गोवेकर यांचाही पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच तिच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिद्धेश तेंडोलकर, माजी अध्यक्ष विवेक नार्वेकर, शिक्षिका अस्मिता गोवेकर, वर्षा गवस, सीमा सावंत, सरीता पाटील,यांनी तिचे अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.









