कराड :
बांधकाम परवान्यासाठी तांत्रिक मुद्यांच्या त्रुटी काढून वारंवार दमवत अखेर दहा लाखांच्या लाचेवर तडजोड करणाऱ्या कराडच्या कार्यमुक्त मुख्याधिकाऱ्यासह चौघांच्या लाचखोर कारनाम्याचा पर्दाफाश झाला. बांधकाम परवाना मंजूर करण्यासाठी 10 लाखांची लाच मागून यातील 5 लाखांची लाच घेणारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. कारवाईत पालिकेचे नुकतीच बदली झालेले मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्यासह सहाय्यक नगररचनाकार यांची बनवाबनवी उघडकीस आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांनी दिली.
संशयितांच्या यादीत मुख्याधिकारी शंकर खंदारे, नगरपरिषदेतील सहाय्यक नगररचनाकार स्वानंद दिलीप शिरगुप्पे (वय 32 रा. संकल्प प्राईड, देसाईनगर, कराड, मूळ रा. कोडोली ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर), बांधकाम विभागाचा कनिष्ठ लिपीक तौफिक कय्यूम शेख (वय 40, रा. कार्वेनाका, सुमंगलनगर, कराड), अजिंक्य अनिल देव यांचा समावेश आहे.
- सन 2017 पासून परवाना तांत्रिक मुद्यात
लाचलुपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ज्या तक्रारदाराच्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जी कारवाई केली, ते तक्रारदार बांधकाम व्यावसायिक आहेत. कराड शहरातील सोमवार पेठेतील सिटी सर्व्हे क्रमांक 79 येथे पार्किंग व पाच मजली इमारतीचे काम प्रस्तावित आहे. तक्रारदारानी 2017 साली इमारत बांधकाम परवाना मिळण्यासाठी प्रस्ताव केला होता. त्या कामाची मुदतवाढ 2 जानेवारी 2019 पर्यंत घेण्यात आली होती. हे काम सुरू न झाल्याने पुन्हा 2021 पर्यंत सुधारित परवानगी मिळाली, मात्र याचदरम्यान नियमावलीत बदल झाल्याने सुधारित बांधकाम परवाना मिळण्यासाठी पुन्हा 2023 साली अर्ज दाखल केला.
- वाढीव एफएसआय मिळाल्याने 10 लाखांची लाच
तक्रारदार याने परवानगी मिळण्यासाठी पुन्हा नगररचनाकार स्वानंद दिलीप शिरगुप्पे यांच्याकडे पाठपुरावा केला. शिरगुप्पे याने तक्रारदार यांची खासगी इसम अजिंक देव याच्यासमवेत भेट घडवून आणली. तक्रारदाराने दिलेल्या परवान्यात त्यांना 2 हजार स्क्वेअर फूट वाढीव एफएसआय बाजारभावाप्रमाणे 80 लाख वाढली आहे. त्यासाठी 80 लाखांच्या दहा ते बारा टक्के लाच द्यावी लागेल, असे संशयितांनी पंचांसमक्ष सांगितले. यातील पाच लाखांचा पहिला टप्पा खासगी इसम देव याच्याकडे देण्याचे ठरले. यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक राजेश वाघमारे यांच्याकडे तक्रार केली.
- पदभार सोडला तरी हाव सुटली नाही
वास्तविक मुख्याधिकारी खंदारे यांनी 20 मार्च रोजी त्यांचा कराड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदाचा पदभार सोडला होता. मात्र या दहा लाखांच्या हव्यासापोटी त्यांनी तक्रारदार यांच्या सुधारित बांधकाम परवान्याच्या फाईलचे चलन स्वानंद शिरगुप्पे व तौफिक शेख यांनी व्हॉटस्अपवर प्राप्त केले. चलनावर तत्कालीन मुख्याधिकारी खंदारे यांनी सह्या करून ते शिरगुप्पे यांच्या मोबाईलवर परत पाठवले. खंदारे यांच्या कृतीने लाच घेण्यास पोषक वातावरण तयार झाल्याचे पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांनी सांगितले.
- पाच लाख घेताना रंगेहाथ पकडले
चलनाची हेराफेरी झाल्यावर संशयित अजिंक्य देव याने कनिष्ठ लिपीक तौफिक याला तक्रारदाराकडून पाच लाख घेण्यास सांगितले. तोपर्यंत पोलीस उपाधीक्षक राजेश वसंत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ा†नरीक्षक सा†चन राऊत, श्रीधर भोसले, हवालदार ा†नतीन गोगावले, गणेश ताटे, ा†नलेश राजपुरे, प्रशांत नलावडे, ा†वक्रमसिंह कणसे यांनी अत्यंत गोपनीय सापळा रचला होता. तक्रारदार पाच लाखाची रोकड देताना पोलिसांनी संशयित तौफिक याला रंगेहाथ गजाआड केले. तसेच स्वानंद शिरगुप्पे यालाही अटक करण्यात आली आहे. या दोघांना कराड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. खंदारे व देव यांचा शोध सुरू आहे.
- कराड पालिकेच्या इतिहासात प्रथमच एसीबीची कारवाई
कराड नगरपालिकेच्या इतिहासात आजपर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई पालिकेत झाली नव्हती. मुख्याधिकारी शंकर खंदारे स्वत:च या प्रकरणात अडकल्याने पालिकेच्या लौकिकाला बट्टा लागला आहे. त्यांच्यासह पालिकेतील अन्य दोन कर्मचारी व एक खासगी इसमही या कारवाईत अडकला आहे.








