वृत्तसंस्था/ लंडन
येथील विम्ब्ले स्टेडियमवर सोमवारी झालेल्या फिफाच्या विश्वकरंडक पात्र फेरीच्या फुटबॉल सामन्यात यजमान इंग्लंडने लॅटव्हियाचा 3-0 अशा गोल फरकाने एकतर्फी पराभव केला.
या सामन्यात इंग्लंड संघातील रिसे जेम्सने फ्रिकीकवर शानदार गोल नोंदविला तर इबेरेची इझेने इंग्लंडतर्फे आणखी एका गोल केला. इझेचा हा आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यातील पहिला गोल ठरला आहे. तब्बल अडीच वर्षानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रात पहिलाच सामना खेळणाऱ्या जेम्सने 37 व्या मिनिटाला इंग्लंडचे खाते उघडले. जेम्सचा इंग्लंडतर्फे प्रतिनिधीत्व करताना 18 व्या सामन्यातील पहिला गोल आहे. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत इंग्लंडने लॅटव्हियावर 1-0 अशी आघाडी मिळविली होती. सामन्याच्या उत्तराधार्थ रॉजर्स आणि राईस या जोडगोळीने इंग्लंडकडून आघाडीफळीची जबाबदारी उचलताना अनेक चाली केल्या. दरम्यान इझेने उजव्या बगलेतून मिळालेल्या पासवर लॅटव्हियाच्या गोलपोस्टमध्ये चेंडू अचूकपणे लाथाडला. इंग्लंडचा या सामन्यातील हा दुसरा गोल ठरला. 2026 साली होणाऱ्या फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी इंग्लंड संघाने युरोपा गट ए मधून स्पर्धेत विजेतेपद मिळवून आपली पात्रता सिद्ध केली आहे. इंग्लंडच्या फुटबॉल संघाला आता थॉमस टचेल हे नवे प्रशिक्षक लाभले आहेत.
या स्पर्धेत अन्य एका झालेल्या सामन्यात अल्बेनियाने आपला पहिला विजय नोंदविला. तत्पूर्वी अल्बेनियाला गेल्या शुक्रवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडकडून 0-2 अशी हार पत्करावी लागली होती. पण सोमवारच्या सामन्यात अल्बेनियाने अॅन्डोराचे आव्हान 3-0 असे संपुष्टात आणले. अल्बेनियातर्फे रे मॅनेजने पूर्वाधार्थ 2 गोल तर युझेनीने उत्तराधार्थ 1 गोल केला. ग गटातील अन्य एका सामन्यात पोलंडने माल्टाचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात पोलंडतर्फे स्वीडेरस्कीने 2 गोल केले. फिनलॅड आणि लिथुनिया यांच्यातील सामना 2-2 असा बरोबरीत राहिला. च गटातील सामन्यात बोस्नीयाने सायप्रसचा 2-1 असा फडशा पाडला. रुमानियाने सॅनमॅरीनोचा 5-1 असा एकतर्फी पराभव केला.









