वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ड्रीमस्पोर्ट्स टेबल टेनिस चॅम्पियनशिप 15 वर्षांखालील वयोगटातील स्पर्धेत मुलांच्या एकेरीमध्ये चंदीगडच्या साहील रावतने काश्मिरच्या गुप्ताचा पराभव करत विजेतेपद मिळविले.
साहील रावतने अंतिम सामन्यात जम्मू काश्मिरच्या ऋत्विक गुप्तावर 6-11, 11-7, 6-11, 11-5, 6-11, 11-9, 11-5 अशा सेट्समध्ये पराभव केला. मुलींच्या 15 वर्षांखालील वयोगटात मुंबईच्या दिव्यानेशी भोमिकने पश्चिम बंगालच्या श्रेया धरचा 11-5, 11-6, 11-8, 11-7 असा पराभव करत विजेतेपद मिळविले. भारताचे माजी ऑलिम्पिकन टेबल टेनिसपटू शरथ कमल आणि श्रीजा अकुला यांच्या हस्ते एकेरीतील विजेत्याला प्रत्येकी 1 लाख रुपयांचे तर उपविजेत्याला 50 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.









