वृत्तसंस्था / नवी दिल्ली
बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार तमिम इक्बाल याला ढाका प्रिमीयर लीग क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्याच्यावर अॅन्जीओप्लास्टी करण्यात आली आहे.
36 वर्षीय तमिम इक्बालला या सामन्यात खेळताना छातीत वेदना होऊ लागल्या. लागलीच तो रुग्णालयात दाखल झाला. त्याला हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सोमवारी एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर अॅन्जीओप्लास्टी (शस्त्रक्रिया) करण्यात आली. तमिम इक्बालने गेल्या जानेवारीत दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. तमिम इक्बालने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीत 70 कसोटी, 243 वनडे खेळले आहेत. तसेच त्याने 78 टी-20 सामन्यात 1758 धावा जमविल्या आहेत.









