वृत्तसंस्था / पुणे
येथील बालेवाडी क्रीडा संकुलामध्ये 8 ते 12 एप्रिल दरम्यान बिली जीन किंग चषक आशिया ओसेनिया गट 1 साठीची टेनिस स्पर्धा आयोजित केली असून यामध्ये यजमान भारतासह अन्य सहा संघांचा समावेश आहे.
या स्पर्धेमध्ये यजमान भारत, न्यूझीलंड, चीन तैपेई, हाँगकाँग, कोरिया आणि थायलंड हे देश सहभागी होत आहेत. सदर स्पर्धा राऊंडरॉबीन पद्धतीने खेळविली जाईल. या स्पर्धेत अंकिता रैनाच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघ सहभागी होत आहे. या संघामध्ये सहेजा यमलापल्ली, श्रीवल्ली भामीदीपाती, वैदेही चौधरी यांचा समावेश आहे. त्याच प्रमाणे दुहेरीत प्रार्थना ठोंबरे सहभागी होणार आहे.









