सांगली :
जत तालुक्यातील उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करडेवाडी येथील मोरया ज्वेलर्समधून १२ ग्रॅमचे सोने चोरून नेलेल्या संशयिताच्या घरातून १२ ग्रॅम सोने स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडून जप्त करण्यात आले आहे.
ही चोरी आंतरराज्य गुन्हेगार मोहमंद अली बाबर अली इराणी रा. श्रीकृष्णनगर गदग, कर्नाटक यांने केल्याचे समोर आल्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने त्याच्या घरी छापा टाकला असता तो त्याठिकाणाहून परागंदा असल्याचे समोर आले पण त्यांने चोरी केलेले सोने घरात आढळून आल्यावर पोलिसांनी हे ९६ हजार रूपयेचे सोने जप्त केले आहे.
१९ फेब्रुवारी रोजी आंतरराज्य गुन्हेगार मोहमंद अली बाबर अली इराणी करडेवाडी येथील मोरया ज्वेलर्स येथे आला होता. त्यांने याठिकाणी अर्घा तोळ्याची वस्तू दाखवण्यास सांगितले आणि दुकानदारांचे दुर्लक्ष असल्याचे पाहून त्यांने त्याठिकाणाहून १२ ग्रॅम सोने चोरून नेले. इराणी गेल्यानंतर दुकानदाराच्या लक्षात ही चोरी आली आणि त्यांनी उमदी पोलीसांशी संपर्क साधून दुकानातील सीसीटीव्ही फुटेज दिले त्यावेळी चोरी झाल्याचे समोर आले. शोध लावण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले होते. पथकाने ही चोरी इराणी यांने केली असल्याचे समोर आले त्यांनी छापा टाकला त्याच्या घरातून हे चोरीचे सोने जप्त करण्यात आले.








