पारंपरिक अन् आधुनिक पद्धतीची आभूषणे पाहण्याची-विकत घेण्याची दुर्मीळ संधी : प्रदर्शन दोन दिवस चालणार
बेळगाव : ‘आर्ट कॅरेट’ या सुप्रसिद्ध कंपनीने बेळगावातील अयोध्यानगर येथील ‘युके 27-द फर्न’ या हॉटेलात आभूषणांचे भव्य प्रदर्शन ‘खजाना कलेक्शन’ आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचा प्रारंभ आज 22 मार्च 2025 (शनिवार) या दिवशी होणार असून ते दोन दिवस चालणार आहे. या प्रदर्शनामुळे पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीची आभूषणे आणि दागदागिने पाहण्याची तसेच विकत घेण्याची दुर्मीळ संधी बेळगावकर आभूषणप्रेमी नागरीकांना उपलब्ध झाली आहे. ‘आर्ट कॅरेट’ हा अत्यंत आकर्षक असा आभूषणांचा ब्रँड असून, नेहमीच चोखंदळ आभूषणप्रेमींच्या पसंतीला उतरला आहे. भारताच्या वैभवी इतिहासाची साक्ष देणारी चित्तवेधक हँडमेड डिझाईन्स आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख संगम या प्रदर्शनात ग्राहकांना पहावयास मिळणार आहे. ‘खजाना कलेक्शन’ प्रदर्शन भारताचे प्राचीन हस्तकौशल्य आणि समृद्ध परंपरा यांचे प्रतीक ठरणार आहे.
अप्रतिन रचना आणि हस्तकौशल्य
भारताच्या राजेशाही आभूषण परंपरेने प्रेरित असलेले हे ‘खजाना कलेक्शन’ आहे. प्राचीन काळापासून चालत आलेल्या या ऐतिहासिक परंपरेला आधुनिकतेचा साज चढवून आभूषणे घडविण्यात आली आहेत. प्राचीनत्व आणि आधुनिकता यांचा संगम ही आजच्या काळातील ग्राहकांची मागणी असते. याच मागणीला अनुसरुन असणारी आभूषणे या प्रदर्शनात आहेत. पोलकी, पुंदन आणि मीनाकारी याचे अत्युच्च दर्शन येथे घडणार असून्। ‘आर्ट कॅरेट’ ज्यासाठी विख्यात आहे, त्या कलाकौशल्याचा अनुभव या प्रदर्शनात ग्राहकांना घेता येणार आहे.
प्रदर्शनात काय उपलब्ध
मॅजेस्टिक नेकलेस आणि चोकर्स, रजपूत आणि मोगल काळातील सुरेख, आकर्षक डिझाईन्स, रीगल झुमका आणि चंदबालीस-चित्तवेधक डिझाईन्सची कर्णभूषणे आणि इअररिंग्ज तसेच नाजूक अलंकार, कलाकुसरयुक्त बांगड्या आणि कडी, पारंपरिक डिझाईन्स आणि नाजूक फिनिशिंग असणाऱ्या नेत्रसुखकारक बांगड्या, दिमाखदार ‘मांग टिक्का’ आणि मस्तकाभूषणे पहायला मिळतील. या प्रदर्शनातील प्रत्येक आभूषणाची निर्मिती केवळ हस्तकौशल्यातून झाली असल्यामुळे ती दिमाखदार आणि चित्तवेधक आहे. कोणत्याही कार्यक्रमाचे रुपांतर शानदार सोहळ्यात करण्याची या आभूषणांची क्षमता आहे. विवाह सोहळे, सणवार आणि अन्य कार्यक्रम परमोच्च पद्धतीने साजरे करण्यासाठी आवश्यक अशी सर्व आभूषणे या प्रदर्शनात उपलब्ध असून, ग्राहकांना खुणावत आहेत.
अमेरिकेतही प्रदर्शन
‘खजाना कलेक्शन’चा शुभारंभ साजरा करण्यासाठी ‘आर्ट कॅरेट’कडून भारत आणि अमेरिकेतील मुख्य शहरांमध्ये अशा प्रदर्शनांची मालिकाच आयोजित केली जाणार आहे. या प्रदर्शनांमधून कलाप्रेमी ग्राहकांना नितांतसुंदर निवड करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच आभूषण तज्ञांशी संवाद साधून आपल्याला हव्या तशा शैलीतील आभूषणे खरेदी करण्याची सोयही उपलब्ध होत आहे.
‘आर्ट कॅरेट’ काय आहे!
‘आर्ट कॅरेट’ची स्थापना तीन दशकांपूर्वी करण्यात आली आहे. या कंपनीने हस्तनिर्मिती आभूषण कलेची पुनर्निमिती करून भारतीय आभूषण परंपरेला जणू नव्याने झळाळी मिळवून दिली आहे. ‘आर्ट कॅरेट’ची आभूषणे दर्जेदार, दिमाखदार आणि वैशिष्ट्यापूर्ण असल्याने ग्राहकांना समाधानी करतात. परिणामी ‘आर्ट कॅरेट’ने अल्पावधीतच ग्राहकांचा विश्वास प्राप्त केला आहे. तिच्या आभूषणांमध्ये उपयोगात आणलेली रत्ने अस्सल असतात. ही आभूषणे भारताच्या देदीप्यमान ऐतिहासिक परंपरेची द्योतके असून, ग्राहकांच्या अपेक्षा सर्वार्थाने पूर्ण करणारी असतात.
प्रदर्शनाच्या माहितीसाठी भेट द्या
बेळगावमध्ये होणाऱ्या ‘खजाना कलेक्शन’ प्रदर्शनाच्या सविस्तर माहितीसाठी www.artक्arat.म्दस् या वेबसाईटला भेट द्यावी. तसेच आजपासून प्रारंभ होणाऱ्या बेळगावातील प्रदर्शनाला भेट द्यावी आणि अप्रतिम आभूषणांच्या सान्निध्याचा पुरेपूर लाभ उठवावा, असे आवाहन ‘आर्ट कॅरेट’ तर्फे करण्यात आले आहे.









