सामाजिक कार्यक्रमांसह विविध उपक्रमांचे आयोजन
बेळगाव : क्रेडाई बेळगावतर्फे 2023-24 व 24-25 या आर्थिक वर्षात विविध उपक्रम आयोजित केले होते. बांधकाम व्यावसायिक तसेच नागरिकांच्या सोयीसाठी अनेक उपक्रम हाती घेतले होते. सर्वसामान्यांना बांधकाम व्यवसायाची माहिती मिळावी, उभारले जात असलेले प्रकल्प नागरिकांना समजावेत, यासाठी बेल्कॉनसारखे महत्त्वाचे प्रदर्शन आयोजिले होते. अध्यक्ष दीपक गोजगेकर यांच्या नेतृत्वाखाली क्रेडाईने मागील दोन वर्षात अनेक महत्त्वाचे कार्यक्रम आयोजित करण्यांबरोबरच विविध समस्या निवारणासाठी सरकारसोबत चर्चा केली आहे. मे 2023 मध्ये नवीन सदस्यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर क्रेडाईतर्फे कावेरी या सबरजिस्ट्रर क्षेत्राशी संलग्न असणाऱ्या सॉफ्टवेअरविषयी माहिती दिली. त्याचबरोबर तहसीलदार, महसूल व नोंदणी खात्याच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. 2024 मध्ये बेंगळूर येथे झालेल्या स्टेट कॉर्नमध्ये क्रेडाईचे 50 सदस्य सहभागी झाले होते. इंजिनिअर असोसिएशनच्या सहयोगाने रेरा विषयी माहिती देणारी कार्यशाळा आयोजिली होती. 2024-25 मध्ये नवे 20 सदस्य जोडले.
ई-खाताविषयी अडचणींबाबत मंत्री लक्ष्मी हेब्बाळकरांशी चर्चा
ई-खाताविषयी येणाऱ्या अडचणींबाबत मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांची बेळगावच्या रेलवे प्रश्नाबाबत भेट घेण्यात आली. ई-खाताबाबत बेळगाव महानगरपालिकेला निवेदन देखील दिले. याबरोबरच पीआयडी व काही नियम शिथिल करण्यासाठी मनपा आयुक्त तसेच इतर महसूल अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली. चैतन्य कुलकर्णी, राजेंद्र मुतगेकर, कैस नुरानी, मदन देशपांडे, आनंद कुलकर्णी, राजेश हेडा, विनय पाटील, पी. एस. हिरेमठ यांनी वेळोवेळी क्रेडाईला सहकार्य केले आहे. त्याचबरोबर क्रेडाईचे संचालक व विद्यमान सेक्रेटरी युवराज हुलजी, खजिनदार प्रशांत वांडकर, उपाध्यक्ष गोपालराव कुकडोलकर, आनंद अकणोजी, अमर अकणोजी, राजेश माळी, विठ्ठल हुबळी, सलीम शेख, राजेश कांबळे, सचिन बैलवाड यांनी विविध उपक्रम राबविण्यासाठी क्रेडाईला सहकार्य केले. त्याचबरोबर महिला विंगतर्फे दीपा वंडकर व करुणा हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिलांसाठीचे उपक्रम राबविण्यात आले.









