सांगली :
रस्त्याकडेला बोलत थांबलेल्या तीन विद्यार्थ्यांना भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने विद्यार्थी जखमी झाले. ही घटना मंगळवारी रात्री ११.३० च्या सुमारास इनामधामणी येथील नरवीर उमाजीराजे कमानीनजीक घडली.
याप्रकरणी तेजस बाळकू शेंळकदे (वय २२, रा. पोलीस लाईन, पोलीस मुख्यालय विश्रामबाग) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अपघातात आयुष सागर मलमे (वय ९), आदित्य राहूल मलमे (वय १०) आणि शिवम राहुल मलमे (वय ११) हे तिघे जखमी झाले. याबाबत सागर सर्जेराव मलमे (रा. इमानधामणी) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी सागर मलमे यांचा मुलगा आयुष, पुतण्या आदित्य आणि शिवम असे तिघेजण रात्रीच्या सुमारास फिर्यादी सागर यांच्या घरासमोर एकमेकांशी बोलत थांबले होते. त्यावेळी भरधाव वेगाने दुचाकीवरून आलेल्या तेजस शेंळकदे याची धडक तीन विद्यार्थ्यांना बसली. यामध्ये तिघाही विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाली. तसेच दुचाकीचे देखील १० हजार रुपयांचे नुकसान झाले.








