वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांचा विश्वास : टॅक्सीचालकांना एकाच वेळी अनेक अॅप्स वापरण्याची मुभा
पणजी : प्रस्तावित गोवा ट्रान्सपोर्ट अ?ग्रीगेटर मार्गदर्शक तत्त्वे 2025 अंतर्गत सरकारी भाडे : ड्रायव्हराची उदरगत योजनेवर चर्चा करण्यासाठी आणि अॅप आधारित टॅक्सी सेवांचे नियमन करणे, तसेच चालक आणि प्रवाशांसाठी योग्य धोरणे सुनिश्चित करण्यासाठी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. ही योजना टॅक्सीचालकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असा विश्वास मंत्री गुदिन्हो यांनी व्यक्त केला.
या बैठकीला वाहतूक संचालक प्रविमल अभिषेक, ओएसडी एथेल नुनेस आणि सर्व सहाय्यक वाहतूक संचालक (एडीटी) यांची उपस्थिती होती. सदर साहाय्यक वाहतूक संचालक विविध भागातील टॅक्सी चालकांशी सक्रियपणे संवाद साधत असून यासाठी मोठ्या प्रमाणात सकारात्मकरित्या प्रतिसाद मिळत आहे. याचबरोबर धोरण अंतिम करण्यापूर्वी जनमताने आणि सल्लामसलतीने पुढील निर्णय घेण्यात येतील असे मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.
या योजनेअंतर्गत अॅपद्वारे बुक केलेल्या प्रत्येक फेरीसाठी चालकांना सरकारने मंजूर केलेले भाडे मिळेल. परंतु त्याचदिवशी देयके किंवा पेमेंट निश्चित करावी लागतील, अन्यथा अ?ग्रीगेटरना प्रत्येक विलंबित पेमेंटसाठी 25 टक्के दंड भरावा लागेल. प्रत्येक फेरीच्या पहिल्या तीन किलोमीटरसाठी किमान भाडे लागू होईल. अॅप-आधारित चालकांना भाडे मीटरची आवश्यकता नाही. नवीन ईव्ही खरेदी करण्यासाठी 1 लाख अनुदानासह विमा परतफेडसाठी पात्र असतील. अ?ग्रीगेटर्सना फक्त वैध गोवा पीएसव्ही बॅज असलेल्या चालकांना आणि वैध परवाने असलेल्या गोव्याच्या टॅक्सींनाच ऑनबोर्ड करावे लागेल, ज्यामुळे स्थानिक सहभाग सुनिश्चित होईल.
टॅक्सीचालक एकाच वेळी अनेक अॅप्स वापरू शकतात, ज्यामुळे प्रवाशांना उचलण्यात लवचिकता येईल. अग्रीगेटर्सना सर्व ऑनबोर्ड चालकांसाठी ऊपये 10 लाखांचा आरोग्य विमा प्रदान करावा लागेल. मंजुरीसाठी अ?ग्रीगेटर्सना राज्य परिवहन प्राधिकरणकडून तीन वर्षांसाठी परवाना मिळवावा लागेल. गोव्यात नोंदणीकृत कार्यालय असावे लागेल आणि 5 लाखांची सुरक्षा ठेव ठेवावी लागेल. अनुपालन न केल्यास प्राधिकरणाच्या मंजुरीशिवाय काम करण्यासाठी रू 50,00,000 आणि भाडे आणि परवाना अटींचे उल्लंघन करण्यासाठी रू 5,00,000 दंड समाविष्ट आहे.
पेमेंट समस्यांचे निराकरण करण्यासाठी तक्रार निवारण यंत्रणा देखील स्थापन केली जाईल, ज्यामध्ये वार्षिक अनुपालन अहवाल पारदर्शकता सुनिश्चित करण्यात येईल. स्थानिक टॅक्सी चालकांना सक्षम बनवण्यासाठी, चालकांना योग्य उत्पन्न मिळवून देण्यासाठी आणि प्रवाशांना संपूर्ण गोव्यात पारदर्शक आणि सुरळीत टॅक्सी सेवा प्रदान करण्यासाठी हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.









