कोल्हापूर :
कोल्हापूर शहरासह सांगली परिसरात घरफोडी, जबरी चोरी करणाऱ्या सराईत मेव्हणे पाव्हण्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून मुरगुड, आजरा, कुरुंदवाडसह सांगली येथील 10 गुन्हे उघडकीस आले असून, 15 तोळे सोने, 167 ग्रॅम चांदीच्या वस्तु एक दुचाकी असा 9 लाख 31 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. उत्तम राजाराम बारड (वय 31 रा. धामोड, राधानगरी), अजिंक्य सयाजी केसरकर (वय 32 रा. मत्तीवाडे ता. चिक्कोडी, बेळगांव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
जिल्ह्यात घडलेल्या घरफोडी, जबरी चोरीसह चेनस्नॅचिंगच्या गुह्यांची उकल करण्याच्या सुचना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी दिल्या होत्या. यानुसार तपास करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला मुरगुड येथील चेन स्नॅचिंगचा गुन्हा सराईत गुन्हेगार उत्तम बारड याने केल्याची माहिती समोर आली. यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कागल येथे सापळा रचून उत्तम बारड आणि अजिंक्य केसरकर याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, या दोघांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र नंतर मुरगुड, आजरा, कुरुंदवाड, जयसिंगपूर, हुपरी, मुरगुड, शहापूर, गोकुळ शिरगांव, जयसिंगपुर, मिरज येथील घरफोडी, चेन स्नॅचिंग, दुचाकी चोरीची कबूली दिली. त्यांच्याकडून 15 तोळे सोन्याचे दागिने, 167 ग्रॅप चांदीच्या वस्तू, दोन दुचाकी जप्त केल्या. पुढील तपासासाठी मुरगुड पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.
पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस अंमलदार संजय कुंभार, विजय इंगळे, रोहीत मर्दाने, सागर माने, महेश पाटील, महेश खोत, लखन पाटील, संदीप बेंद्रे, विशाल चौगुले, शुभम संकपाळ, संजय पडवळ, अमित सर्जे, कृष्णात पिंगळे, हंबीरराव अतिग्रे, सुशिल पाटील, पोलीस अंमलदार तृप्ती सोरटे, संगीता खोत यांनी ही कारवाई केली.
- उत्तम बारडवर 62 गुन्हे
उत्तम बारड हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्गसह कर्नाटक येथे 62 गुन्हे दाखल आहेत. जबरी चोरी, घरफोडी, मोटरसायकल चोरींसह जनावरांच्या चोरीमध्ये त्याचा सहभाग आहे.
- चोरटे मेहुणे- पाहुणे
उत्तम बारड व अजिंक्य केसरकर हे म्हेवणे पाहुणे आहेत. उत्तमच्या मावस बहीणीबरोबर अजिंक्यचा विवाह झाला आहे. अजिंक्य पुर्वी एमआयडीसीमध्ये काम करत होता. यानंतर तो शेती करु लागला. गेल्या तीन महिन्यांपासून उत्तम बारडसोबत चोऱ्या करु लागला.








