कोल्हापूर :
रंगपंचमी खेळ असताना अॅसिड मिश्रीत रंग लावल्याने एक तरूण भाजून गंभीर जखमी झाला. शिवतेज रखमाजी पाटील (वय १६, रा. बालिंगा, ता. करवीर) असे त्यांचे नाव आहे. त्याला उपचारासाठी तत्काळ सीपीआरमध्ये दाखल केले आहे. ही घटना बुधवारी दुपारी घडली आहे. याची नोंद करवीर पोलिसात झाली आहे.
जखमी तरूण गल्लीतील तरूणांच्याबरोबर रंगपंचमी खेळत होता. याचदरम्यान त्यांच्या अंगाला एका मित्राने अॅसिड मिश्रीत रंग लावून, त्यावर पाणी ओतले. त्यानंतर त्या ठीकाणी तत्काळ पेट घेतल्याने, त्याची पाठ भाजली गेली आहे. त्याला त्यांच्या वडीलांनी उपचारासाठी त्वरीत सीपीआरमध्ये दाखल केले आहे.








