ड्राईव्हर अभावी पालिकेचा जेसीबी जाग्यावरच ; नागरिकांनी मानले म्हाडगूत यांचे आभार
मालवण । प्रतिनिधी
मालवण शहरातील डॉ.ठाकूर दवाखाना नजिकच्या परिसरात एक गाय मृत झाल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. यावेळी स्थानिक नागरिकांनी संबंधित नगरपरिषद यांना याबाबतची माहिती देण्यात आली होती. परंतु नगरपरिषद जवळ खरेदी करण्यात आलेल्या जेसीबी वर ड्रायव्हर नसल्याने माजी नगरसेवक महेंद्र म्हाडगुत यांना याबाबतची कल्पना नागरिकांनी दिली. म्हाडगुत यांनी तात्काळ स्वखर्चाने जेसीबी बोलवत गाईची विल्हेवाट लावली. याबाबत नागरिकांनी म्हाडगुत यांनी तात्काळ दखल घेतल्याने आभार मानत समाधान व्यक्त केले.









