काठमांडू
पश्चिम नेपाळमध्ये मंगळवारी सकाळी 4.3 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. परंतु या भूकंपामुळे कुठल्याही प्रकारच्या हानीचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. या भूकंपाचे केंद्र अचलम जिल्ह्यातील बटुलिस्तानात होते. यापूर्वी 8 मार्च रोजी बागलुंग जिल्ह्यात 4.1 तीव्रतेचा भूकंप जाणवला होता. नेपाळ हा देश भूकंपप्रवण क्षेत्रात मोडत असल्याने तेथे भूंकपाचे धक्के जाणवण्याचे प्रमाण तुलनेत अधिक आहे.









