तर उपसरपंचपदी प्रसाद कुडासकर
दोडामार्ग – वार्ताहर
कुडासे सरपंच पूजा बाळाजी देसाई यांनी राजीनामा दिल्याने सरपंच पद रिक्त झाले. त्यामुळे या पदासहित उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी कुडासे येथील ग्रामपंचायत येथे संपन्न झाली. सरपंच पदासाठी नम्रता देसाई व उपसरपंच पदासाठी प्रसाद कुडासकर यांनी अर्ज दाखल केले होते. सरपंच पदी नम्रता देसाई व उपसरपंच पदी प्रसाद कुडाळकर यांची निवड निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केली. यावेळी मंडळ अधिकारी राजन गवस, श्री. शिरसाठ, प्रशासकीय अधिकारी श्री तायडे, ग्राम महसूल अधिकारी सौ भंडारे, ग्रामसेवक अशोक गायकवाड, पोलीस पाटील रेश्मा पाटील, निलेश देसाई, पूजा देसाई, राजाराम देसाई, भाग्यश्री राऊळ यांसह किशोर देसाई, सत्यवान देसाई, संजय धुरी, विनोद शेटये, बाबाजी देसाई, रामदास मेस्त्री, नामदेव देसाई, काशिनाथ राऊत उपस्थित होते. नूतन सरपंच व उपसरपंच दोघांचेही अभिनंदन करण्यात आले.
फोटो
कुडासे : नूतन सरपंच नम्रता देसाई व उपसरपंच प्रसाद कुडासकर यांचे अभिनंदन करताना माजी सरपंच पूजा देसाई, ग्रामपंचायत सदस्य व इतर.
छाया – समीर ठाकूर









