कळंबा / सागर पाटील :
मार्चमध्ये उन्हाचे चटके बसायला सुरवात झाली असतानाच कळंबा तलावातील पाणीसाठा मात्र झपाट्याने कमी होत चालला आहे. कोल्हापूर महापालिका व कळंबा ग्रामपंचायतीने तलावांमधील पाणी उपसाचे योग्य नियोजन केले नाही तर कळंबा गावाला ऐन उन्हाळ्dयात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. मे महिन्यापर्यंत पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. तलावाची पाणी पातळी 15 फुटांवर पोहोचली आहे. जलचरांचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी तलावांतून नऊ फूट पाणी उपसा करावा लागणार आहे. पण तलावातील पाणीसाठा मात्र झपाट्याने कमी होत आहे.
तलावाची गेल्यावर्षी पाणीपातळी व आताची पाणीपातळी पाहता ती गतवर्षी मार्चमध्ये 18 फुटांवर होती. आता ती 15 फुटांवर आहे. त्यामुळे यंदा कळंबा गावालाही ग्रामपंचायतीने एक दिवस आड पाणी पुरवठा करण्यास सुरवात केली आहे. मार्च महिन्यातच आत्ताच ही वेळ आल्याने अजून दोन ते तीन महिने होताच पावसाळा सुरू होईल. पण कळंबा गावसह काही दिवसांनी कोल्हापूर शहरालाही त्याची झळ बसणार आहे. बेसुमार पाणी उपस्यामुळे कळंबा तलावातील 40 टक्के पाणीसाठा कमी झाला. तलावाचे पश्चिम व दक्षिण बाजूस पात्र मोठ्या प्रमाणात कोरडे पडू लागले आहे.
महापालिका आणि कळंबा ग्रामपंचायतीने तलावांमधील पाणी उपसाचे योग्य नियोजन केले नाही तर गावाला ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, तलावाची पाणी पातळी 15 फुटांवर पोहोचली आहे. जलचरांचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी तलावांतून अजून 9 फूट पाणी उपसा करावा लागणार आहे. यंदा नोव्हेंबर ते डिसेंबरपर्यत पाऊस झाल्यामुळे तलाव चार वेळा ओसंडून वाहिला. त्यामुळे तलावात मुबलक पाणी साठा झाला होता. पाणी पातळी 27 फुटांवर पोहोचली होती. मात्र चार महिन्यांत कळंबा ग्रामपंचायतीसह महापालिकेने तलावांमधून बेसुमार पाणी उपसा सुरू ठेवला आहे. त्यामुळे तलावाच्या पाणी पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे.
चार महिन्यांत नऊ फूट पाणीसाठा कमी झाला आहे. तलावांमधून रोज 5 ते 6 एमएलडी पाणी उपसा केला जात आहे. त्यात निम्म्या शहरासाठी महापालिका 2 ते 3 लाख लिटर म्हणजे 2 ते 3 एमएलडी पाणी उपसा करत आहे. तर कळंबा ग्रामपंचायत रोज 2 ते 3 लाख लिटर म्हणजे 2 ते 3 एमएलडी पाणी उपसा करत आहे. दरम्यान, नागरी वहिवाट, उद्योग व हॉटेल व्यवसायातून निर्माण होणारे सांडपाणी ओढ्या–नाल्याद्वारे तलावात मिसळत आहे. दिवस उजाडल्यापासून मावळेपर्यंत जनावरे मोठ्या प्रमाणात तलावात सोडली जात आहेत. त्यामुळे पाणी प्रदूषण होते. तलावाचे काठ दलदलीने भरून गेले असून निर्माल्य, प्लास्टिक कचरा तलावाभोवती साचत आहे.
- गाळ काढणे गरजेचे
नागरिकांची गरज ओळखता भविष्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याने तलावातील पाणी साठा आणखीन वाढवण्यासाठी लोकसहभागातून गाळ काढणे गरजेचे बनले आहे.
- कळंबा तलावातून या भागाला होतो पाणीपुरवठा
कळंबा आणि शहराच्या बी वॉर्ड मंगळवार पेठ, पाण्याचा खजिना, टिंबर मार्केट जुना वाशी नाका, शिवाजी पेठ आदी भागाला पाणीपुरवठा केला जातो.
- पाणी काटकसरीने वापरावे
नागरिकांनी पाणी टंचाई ओळखून पाणी काटकसरीने जपून वापरावे त्यामुळे उन्हाळ्dयात कळंबा गावाला पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नाही. कोल्हापूर महापालिका प्रशासनाने कळंबा ग्रामपंचायत संयुक्त अशी बैठक घेऊन तलावातील पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. गावासाठी राखीव पाणी साठा शिल्लक ठेवून उपसा करावा, गरज पडल्यास तलावातून पाणी उपसा बंद करण्याचा आहे.
– सुमन गुरव, सरपंच, कळंबा








