वृत्तसंस्था/ कोलकाता
फोक्सवॅगन या कंपनीने आपल्या नव्या टायगून आर-लाईन या नव्या गाडीच्या लाँचिंगची तारीख जाहीर केली आहे. घोषणेनुसार पुढील महिन्यात कंपनी 14 तारखेला भारतीय बाजारात गाडी लाँच करू शकते. एसयूव्ही गटामध्ये ही गाडी येणार असून जिची किंमत 50 लाख रुपयांच्या घरात असणार असल्याची माहिती आहे.
पेट्रोल, डिझेल आणि हायब्रीड या तीन प्रकारामध्ये सदरची गाडी सादर केली जाणार आहे. भारतामध्ये कंपनी डिझेल इंधन पर्यायाची गाडी उपलब्ध करणार नाही. कंपनीने प्लग इन हायब्रीड पर्यायाची गाडी सादर केली आहे. या गाडीत 12 इंचाची इन्फोटेन्मेंट सिस्टीम, 10.3 इंचाचा डिजीटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिला जाणार असून वायरलेस फोन चार्जर, पॅनारॉमिक सनरुफ आदी सोयीसुविधा कंपनी गाडीत देणार आहे.









