बॉलीवूडमधल्या सिलेब्सनी आपल्या कुटुंबासोबत केली रंगांची उधळण. दिया मिर्झा आणि पती वैभव रेखी सोबत पर्यावरणपूरक धुळवड साजरी केली. दिया मिर्झा नेहमीच पर्यावरणाचा समतोल राखून सोहळ्यांच्या आनंद लुटते.

अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ या दोघांनी यंदा जोरदार रंगाची बरसात केली. 'छावा' चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत असताना, विकीसाठी ही धुळवड स्पेशल ठरली आहे. 

प्रिती झिंटाने आपल्या कुटुंबियांसोबत होळीचे रंग खेळले. प्रितीने पतीसोबत परदेशात राहूनही आपल्या मुलांसोबत भारतीय सण उत्सवांचा आनंद लुटला आहे. 

प्रिती झिंटाने  २०१६ साली तिच्या अमेरीकन बॉयफ्रेण्ड जेन गुडइनअफ शी विवाह गाठ बांधली. विवाहनंतर प्रिती अमेरिकेत लॉस एन्जेलीसमध्ये शिफ्ट झाली. या दोघांना एक मुलगा व एक मुलगी अशी जुळी मुले आहेत. 

प्रियंका चोप्रा आणि निक जोनास सह कुटुंब नेहमी रंगांच्या उत्सवात सहभागी होतात. प्रियंका तिच्या लेकीसोबत भारतीय सणांनिमित्त नेहमी पूजा अर्चा करते. प्रियंका आणि निक यांच्या मुलीचा जन्म जानेवारी २०२२ मध्ये झाला. मालती मेरी चोप्रा जोनास असे तिचे नाव आहे.