मसूर :
कराड तालुक्यातील पाडळी (हेळगाव) येथील ऋतुराज बाळासाहेब जाधव यांची भारतीय सैन्यदलात लेफ्टनंटपदी निवड झाली आहे. ग्रामीण भागातील बिद्यार्थीही उच्चशिक्षण घेऊन आपल्या कुटुंबाचे, गावाचे, जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करू शकतात, हेच ऋतुराज यांनी दाखवून दिले आहे. यानिमित्ताने ऋतुराज जाधव यांनी ग्रामीण भागातील युवा पिढीसमोर आदर्श निर्माण केला आहे.
कराड तालुक्याच्या उत्तरेकडील टोकावरील पाडळी हे गाव होय. गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना झगडावे लागत होते. अशी बिकट परिस्थिती असताना पाडळीसह परिसरात परिचित असलेले पाडळी येथील कै. शंकरराव भाऊसो जाधव (नाना) यांचे नातू भारतीय हवाई दलाचे सेवानिवृत्त विंग कमांडर बाबासाहेब शंकरराव जाधव यांचे पुतणे आणि कराड तालुका खरेदी विक्री संघाचे माजी संचालक बाळासाहेब जाधव यांचे सुपुत्र ऋतुराज जाधव यांची भारतीय सैन्यदलात लेप्टनंटपदी (वर्ग १) अधिकारी म्हणून निवड झाली आहे.
सर्वसामान्य कुटुंबातील ऋतुराज जाधव यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मुंबई येथे पूर्ण झाले आहे नंतर औरंगाबाद येथील सैनिक प्रशिक्षण संस्थेत बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी फर्ग्युसन कॉलेज, पुणे येथून बीएस्सी स्टॅ टिस्टिक्सचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी २०२३ यूपीएससी (सी.डी.एस.) ही परीक्षा उत्तीर्ण होऊन ऑ ल इंडिया ९२ वा रैंक मिळवला. त्यांनी ऑ फिसर्स ट्रेनिंग अॅ कॅडमी (ओटीए), चेन्नईमधील खडतर प्रशिक्षण पूर्ण करत भारतीय सैन्यदलात आर्टिलरी रेजिमेंटमध्ये निवड झाली आहे.








