दिल्ली
अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने नुकतच तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो डम्प पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिचे सहज क्लिक मधील अनेक फोटो आहेत. पण यापैकीच एका फोटोमध्ये समंथाच्या हातावरचा टॅटू फिकट झालेला दिसल्याने नेटकऱ्यांमध्ये चर्चेचे जोरदार वादळ सुरू आहे.
समंथाचा हा टॅटू तिचा पुर्वाश्रमीचा पती नागा चैतन्यसोबत शेअर केला होता. हा टॅटू दोघांच्या मनगटावर काढला होता. समंथाच्या या पुसट होणाऱ्या टॅटूच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या कमेंटचे मात्र उधाण आले आहे.
समंथाचा हा चैतन्य सोबतचा मॅचिंग टॅटू होता. या टॅटूचा अर्थ होता, तुमचे स्वतःचे वास्तव तयार करा. या पोस्टमध्ये समंथाचे मॉकटेलचे सिप घेताना, हॉस्पिटलच्या बेडवर झोपून असताना असे काही फोटोज शेअर केले आहेत. पण त्यापैकीच एक फोटोमध्ये दिसणाऱ्या या पुसटशा टॅटूने मात्र नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.









