रत्नागिरी :
कोकणातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केवळ उद्योगपतींचे भलं करण्यासाठी केला जात आह़े लोकांना जाती–धर्मामध्ये अडकवून ठेवल्यास आपल्याला मनमानी कारभार करता येईल, असा समज सत्ताधाऱ्यांचा झाला आह़े शक्तीपीठ मार्गाची मागणी कुणीही केली नव्हती. असे असतानाही उद्योगपतींसमोर रेड कार्पेट टाकण्यासाठी हा अट्टाहास केला जात असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केली.
सकपाळ हे कोकण दौऱ्यावर आले असून शासकीय विश्रामगृह माळनाका येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत हेत़े यावेळी माजी खासदार हुसेन दलवाई, आमदार भाई जगताप, माजी आमदार हुस्नबानू खलिफे, काँग्रेस माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर आदी उपस्थित हेत़े सकपाळ म्हणाले, मुंबईतील मराठी मतदार हा बहुतांश कोकणातील आह़े त्यामुळे कोकणातील वातावरण खराब झाल्यास त्याचा परिणाम मुंबईत दिसेल़ मुंबईतील मराठी मतदार धर्माच्या नावाखाली मतदान करेल व आपल्याला मुंबई ताब्यात घेता येईल, असाही डाव खेळला जात आह़े परंतु समाजात शांतता नांदावी यासाठी काँग्रेसकडून बांदा ते चांदा अशी सद्भावना यात्रा काढेल. काँग्रेसने देशात सत्तेचे विकेंद्रीकरण केले होत़े भाजप मात्र देशात सत्तेचे केंद्रीकरण करत आह़े लोक आता आपला नगरसेवक कोण होता, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य कोण होते, हे विसरून गेले आहेत़ सर्व सत्ता आपल्याच ताब्यात राहिली पाहिजे, असा भाजपचा अट्टाहास आह़े त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे भाजप टाळत असल्याचा आरोप सकपाळ यांनी केल़ा
- रत्नागिरी–सिंधुदुर्गात काळू–बाळूचा तमाशा
सिंधुदुर्गचे पालकमंत्री बेताल वक्तव्य करून लोकांना इतिहासाबद्दल चुकीची माहिती देत आहेत. तर रत्नागिरीत डांबर घोटाळ्dयाचा प्रकार समोर येत आह़े दोन्ही जिह्यात सध्या काळू–बाळूचा तमाशा सुरू असून आतून कीर्तन बाहेरून तमाशा अशीच स्थिती असल्याची बोचरी टीका सकपाळ यांनी यावेळी केल़ी तर रत्नागिरीतील डांबर घोटाळ्dयासंबंधी लक्षवेधी उपस्थित करण्यात येणार असल्याचे विधानपरिषद आमदार भाई जगताप यांनी सांगतिले. विधान परिषद अध्यक्षांकडे हा विषय असून लक्षवेधी लावली जात नाह़ी लवकरच हा विषय काँग्रेस पक्षाकडून विधानसभेत उपस्थित केला जाईल, असे जगताप म्हणाले.
- जिल्हा काँग्रेमधील मतभेद होळीत जाळले
जिल्हा काँग्रेसमधील मतभेद होळीमध्ये जाळून टाकण्यात आले आहेत़ आता मागे बघायचे नसून पुढील वाटचाल करायची आह़े आघाडी धर्मामुळे जिह्यात एकही उमेदवार उभा करता आला नव्हत़ा मात्र भविष्यात काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सकपाळ यांनी यावेळी सांगितल़े
- औरंगजेबाची कबर ही महाराजांच्या शौर्याचे प्रतीक
औरंगजेब अत्यंत क्रूर होत़ा त्याने स्वत:च्या वडिलांना कैद करून ठेवले हेते. तसेच आपल्या नातेवाईकांनाही त्रास दिल़ा मराठा साम्राज्य संपवण्यासाठी आलेल्या औरंगजेबाची कबर या महाराष्ट्रात खणली गेल़ी हे महाराजांच्या शौर्याचे प्रतीक आह़े मराठी माणसाचा इतिहास पुरण्याचे काम हे सरकार करत आह़े देवेंद्र फडणवीस यांचा कारभारही औरंगजेबासारखाच सुरू असल्याची टीका सकपाळ यांनी केल़ी
- शिवेंद्रराजे भोसलेंनी सरकारमधून राजीनामा द्यावा
छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्यांना भाजप सुरक्षा देण्याचे काम करत आह़े महाराजांचा अवमान करणाऱ्यांना पुरस्कार दिला जात आह़े भाजपला महाराजांचा विचार मान्य नाही, गोळवळकरांनी संभाजी महाराजांबद्दल आपल्या ‘बंच ऑफ थॉट्स’ पुस्तकात व सावरकरांनी आपल्या पुस्तकात काय लिहून ठेवलय ते वाचावं. सुमारे दोनशे वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लपवून ठेवण्याचे काम याच विचारसरणीच्या लोकांकडून करण्यात आल़े हा विचार मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंना मान्य आहे का, नसेल तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडले पाहिजे, असे सकपाळ यांनी सांगितल़े
- राज्यात मूकं, बहिरं आणि आंधळं सरकार
राज्यात बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. राज्यातील उद्योग गुजरातात जात आहेत़ मुंबई गुजरातला मिळाली नाही, याचे शल्य काही लोकांना आह़े महाराष्ट्राच दरडोई उत्पन्न कमी होत आह़े 10 लाख लाडक्या बहिणींना योजनेतून वगळण्यात आलं आह़े सरकार मुकं, बहिरं व आंधळं झाले आह़े जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही, असा आरोप सकपाळ यांनी केला.
- महाराष्ट्रात ‘गँग ऑफ सरकार’
महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आह़े स्वारगेटसारख्या वर्दळीच्या ठिकाणी मुलीवर अत्याचार होतात, मंत्र्याची मुलगी आज सुरक्षित नाह़ी शेतकऱ्याला कर्जमाफी नाही, शेतमालाला भाव नाही त्यामुळे महाराष्ट्रातील जनता पुरती बेजार झाली आह़े याचे प्रमुख कारण म्हणजे सत्तापिपासू वृत्तीच्या टोळ्या एकत्र येवून गँग ऑफ सरकार चालवित आहेत़ याची मोठी किंमत महाराष्ट्राला चुकवावी लागणार असल्याचे सकपाळ यांनी यावेळी सांगितल़े
- जातीय सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न
महाराष्ट्रात जाणीवपूर्वक जातीय सलोखा बिघडविण्याचे काम केले जात आह़े बीड जिह्यात घडणाऱ्या घटना सर्वांसमोर आल्या आहेत़ आज कुणीही दुसऱ्या जातीच्या माणसाच्या दुकानावर खरेदी करायला जात नाही अशी परिस्थिती निर्माण केली जात आह़े आजपर्यंत 50 खोके एकदम ओके एवढेच आम्हाला माहिती होत़े मात्र आता नवीन खोक्या जन्माला घातला जात आहे, रेती किंग उदयास येत आहेत, हे चित्र महाराष्ट्रासाठी चांगले नाही, असे सकपाळ म्हणाले.








