वाई :
वाई नगरपालिकेच्या सुलतानपूर येथील कचरा डेपोला मध्यरात्री मोठी आग लागली. यामुळे कचरा डेपो लगत असलेल्या औद्योगिक वसाहत सुलतानपूर परिसरात सर्वत्र धुर पसरला होता. आगीचे मोठे लोट दूरवरून दिसत होते. आग विझविण्यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्व पालिकांचे अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले होते. दुपारपर्यंत आग विझवण्याचा प्रयत्न सुरू होता. या आगीत मोठ्या प्रमाणात सुका कचरा जळून गेला.
वाई पालिकेच्या सुलतानपूर येथे कचरा डेपो आहे शहरातील व आजूबाजूच्या ग्रामपंचायती आणि औद्योगिक वसाहतीतील कचरा येथे टाकण्यात येतो. या कचरा डेपोला मध्यरात्री मोठी आग लागली. ही आज एवढी भयानक होती की त्यामुळे परिसरातील औद्योगिक वसाहत सुलतानपूर ग्रामपंचायत आणि लगतच्या ग्रामस्थांमध्ये एकच भितीचे वातावरण तयार झाले. कचरा डेपो लगत असणाऱ्या वाई औद्योगिक वसाहत आणि सुलतानपूर ग्रामपंचायत परिसरात सर्वत्र धुर पसरला होता. सर्वत्र आगीचे धुराचे लोट हवेत दूरवरून दिसत होते.
आग विझवण्यासाठी वाई, सातारा, पाचगणी, महाबळेश्वर, कराड नगरपालिका यासह किसन वीर साखर कारखाना येथील अग्निशामक बंब अविरत काम करत होते. मात्र आग आटोक्यात येत नव्हती. सकाळी सात वाजता आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र दुपारपर्यंत आग धुमसत होती. दुपार पर्यंत घुर निघत होता. दिसणाऱ्या जागेवर पाण्याची फवारणी करण्याचे काम सुरू होते. नाही. वेळीच आग आटोक्यात आणण्यात पालिका प्रशासनाला अपयश आल्याने परिसरातील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. कचरा डेपोवर पालिकेच्या मुख्याधिकारी संजीवनी दळवी, आरोग्य अधिकारी विजय मारोडा आणि सर्व कर्मचारी व विभाग प्रमुख उपस्थित होते. ही आग लागली की अज्ञाताकडून लावण्यात आली याबाबत उलट सुलट चर्चा होत होती. या आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.








