प्रतिनिधी/ बेळगाव
महाराष्ट्र, गोवा, बेंगळूर, म्हैसूरसह देशाच्या प्रमुख शहरांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या विजयकांत डेअरी अँड फूड प्रॉडक्ट्स लिमिटेडच्या किंग आईस्क्रीमने आता कर्नाटकाच्या किनारपट्टी भागात प्रवेश केला आहे. मंगळूर शहरात गुरुवार दि. 13 रोजी किंग आईस्क्रीमचा विक्री शुभारंभ झाला.
व्हीआरएल समूह संस्थेचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक डॉ. विजय संकेश्वर यांनी मंगळूरमधील ओशियन पल हॉटेलच्या सभागृहात किंग आईस्क्रीम विक्रीचा शुभारंभ केला. त्यानंतर त्यांनी ग्राहकांशी संवाद साधला. आज देशभरात आईस्क्रीमची हजारो ब्रँड दिसून येतात. यापैकी मोजकीच ब्रँड ग्राहकांच्या पसंतीला उतरली आहेत. किंग आईस्क्रीमने अल्पावधीतच ग्राहकांची पसंती मिळविली आहे. रुचकर, दर्जा व आरोग्यवर्धक उत्पादन म्हणून किंग आईस्क्रीमची जनमाणसात आज ओळख झाली आहे.
दुग्धजन्य उत्पादने
आईस्क्रीम स्टिक्स, कोन, कप आईस्क्रीम, प्रिमियम आईस्क्रीम पॅक, नॉवेल्टी, टेस्ट आईस्क्रीम, प्रिमियम आईस्क्रीम टब, सिप अप, फॅमिली पॅक, बुलक पॅक, टेक अवे पॅक, प्रिमियम पार्लर बुलक पॅक, कॅटरिंग पॅक, अशा विविध प्रकारात किंग आईस्क्रीमची उत्पादने उपलब्ध आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.









