कमी उंचीचा वाहनांना फटका : अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी, पर्यायी मार्गाचा विचार आवश्यक
प्रतिनिधी/ बेळगाव
टिळकवाडी येथील तिसरे रेल्वेगेट उड्डाणपूल मोठ्या वाहनांसाठी धोकादायक ठरू लागला आहे. अवजड वाहने उ•ाणपुलाच्या खालील बाजूने जात असल्यामुळे उंचीचा अंदाज न आल्याने अपघात होत आहेत. शनिवारी असाच एक कंटेनर उ•ाणपुलाच्या खालील बाजूला अडकला. यामुळे बराचकाळ पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू ठेवावी लागली.
बेळगाव शहरातून गोव्याच्या दिशेने जाणारी वाहने तिसऱ्या रेल्वेगेट उ•ाणपुलाखालून जातात. सुरुवातीला उ•ाणपुलाच्या उजव्या बाजूने मोठी वाहने उद्यमबागच्या दिशेने जात होती. परंतु, उ•ाणपूल ज्या ठिकाणी सुरू होतो, तेथे अपघात होत असल्याने आता डी-मार्ट समोरून ही वाहने सोडली जात आहेत. परंतु, कंटेनरची उंची अधिक असल्यामुळे उ•ाणपुलाच्या खालून वाहने हाकणे धोक्याचे ठरत आहे. सहा महिन्यांपूर्वी रात्रीच्यावेळी उड्डाणपुलाच्या कॉलमचा अंदाज न आल्याने एका ट्रकचालकाने धडक दिली होती. सुदैवाने यामध्ये उ•ाणपुलाचे कोणतेही नुकसान झाले नाही.
शनिवारी एक मोठा कंटेनर शहराकडून गोव्याच्या दिशेने जात होता. परंतु, या कंटेनर चालकाला उ•ाणपुलाच्या उंचीचा अंदाज आला नाही. त्यामुळे हा कंटेनर जाऊन उ•ाणपुलाच्या गर्डरजवळ अडकला. कंटेनरचा वेग अधिक असता तर तो एका बाजूला पलटी होण्याची शक्यता होती. परंतु, चालकाने वेळीच धोका ओळखत कंटेनर थांबवला. बऱ्याच प्रयत्नांनंतर कंटेनर बाहेर काढण्यात आला. परंतु, यामध्ये कंटेनरचे बरेच नुकसान झाले.
पर्यायी व्यवस्थेची गरज
काँग्रेस रोडमार्गे येणारी वाहने उ•ाणपुलाच्या खालून डी-मार्ट मार्गे पुढे जात आहेत. परंतु, डी-मार्टसमोर अतिशय अरुंद रस्ता असल्याने, त्याचबरोबर खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची होणारी गर्दी पाहता या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. तसेच अवजड वाहनांना अडथळे निर्माण होत असल्याने रहदारी पोलिसांनी या सर्व गोष्टींचा विचार करून पर्यायी मार्ग सूचवण्याची मागणी केली जात आहे.









