वृत्तसंस्था / नवी दिल्ली
2025 च्या खास ऑलिम्पिक विश्व हिवाळी क्रीडा स्पर्धेत भारताने दर्जेदार कामगिरी करत चौथ्या दिवसाअखेर एकूण 24 पदकांची कमाई केली आहे. या स्पर्धेच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी भारतीय अॅथलिट्सनी 15 पदके मिळविली.
अल्पेनी स्काईंग या क्रीडा प्रकारात भारताच्या दीपक ठाकुर आणि गिरीधर यांनी सुपर जी एम 04, एम 05 गटामध्ये सुवर्णपदके पटकाविली. नोव्हीसी सुपर जी एम 01 गटामध्ये अभिषेक कुमारने रौप्यपदक घेतले. इंटरमिडेट सुपर जी एफ 03 महिलांच्या विभागात राधादेवीने रौप्यपदक घेतले. शॉर्ट ट्रॅक स्पिड स्केटेंग प्रकारात भारताच्या झायरा पोर्टरने दोन रौप्यपदके मिळविली. 2000 मी. रेस, एम 12 डिव्हीजनमध्ये भारताच्या अनिलकुमारने सुवर्णपदक तर महिलांच्या एफ 12 डिव्हीजनमध्ये हर्लिन कौरने रौप्यपदक घेतले. या स्पर्धेमध्ये 102 देशांचे सुमारे 1500 स्पर्धक सहभागी झाले आहेत.









