तासगाव :
विटा–तासगांव मार्गावर शिरगांव गावचे हद्दीत शिरगांव ओढयाच्या पुलाच्या संरक्षण भिंतीस स्कोडा गाडीची धडक बसून झालेल्या अपघातात गाडीत मागील सिटवर बसलेल्या एकाचा मृत्यू झाला. देवदर्शनासाठी जातानाच काळाने घाला घातला. याप्रकरणी फिर्यादीवरून चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघातात अनिल कृष्णा घाग-57 रा. ए-102, विघ्नहर्ता सोसायटी देवेंद्र इंडस्ट्रीज ईस्टेट समोर यशोधन नगर, ठाणे यांचा मृत्यू झाला आहे. तर याप्रकरणी त्यांचे भाऊ सुरेश कृष्णा घाग रा. शांतीदुत को ऑपरेटिव्ह सोसायटी प्लॉट नं.41 सी-03 सावकरनगर वर्तननगर ठाणे जि. ठाणे, मुळ रा. हडकणी ता. चिपळूण जि. रत्नागिरी यांनी चालक ब्रिजेश दत्तात्रय चव्हाण रा. 103 साई पर्ल अपार्टमेंट प्लॉट नं.70 उल्वे नवी मुंबई सेक्टर 19, उल्वे रायगड यांच्याविरूध्द फिर्याद दिली आहे.
याबाबत माहिती अशी की, फिर्यादी यांचे भाऊ मयत अनिल घाग हे त्यांचे मित्र दत्तात्रय चव्हाण व त्यांचा मुलगा ब्रिजेश चव्हाण असे देवदर्शनासाठी ठाणे ते कोल्हापूर असा प्रवास स्कोडा गाडी नं. एमएच-04 ईटी-0562 ने करीत होते. त्यावेळी ब्रिजेश चव्हाण हे गाडी चालवित होते. त्यांनी गाडी विटा ते तासगांव मार्गाने शिरगांव गावचे हद्दीत शिरगांव ओढ्यावरून असताना गाडी हयगयीने भरधाव वेगात चालवून ओढयाचे पुलाचे संरक्षण भिंतीस धडक बसून अपघात झाला.
यात मागील सिटवर बसलेले फिर्यादी यांचे भाऊ अनिल घाग यांना गाडीचे आतील बाजूचे दरवाजाचे जवळ धडक बसली. त्यामध्ये त्यांच्या डोकीस गंभीर दुखापत होऊन ते मयत झाले. तर त्यांच्या मरणास व गाडीचे नुकसानीस कारणीभूत प्रकरणी ब्रिजेश चव्हाणविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








