माजी आमदार पी. एन. पाटील यांच्या पुतण्याचे निधन
अपघातात सात दुचाकींचे नुकसान
कोल्हापूर
टेंबलाईवाडी उड्डाण पुलावर मध्यरात्री मोठा अपघात झाला आहे. चारचाकी गाडीने सात दुचाकी वाहनांना धडक दिली असून या अपघातात दुचाकींचा चुराडा झाला आहे. अपघातात चारचाकी चालवणाऱ्या धीरज शिवाजीराव पाटील यांचा मृत्यू झाला आहे. धीरज पाटील हे माजी आमदार पी. एन. पाटील यांचे पुतणे होत. चारचाकी चालवत असतना ह्रदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने अपघाती निधन झाले.
धीरज शिवाजीराव पाटील (सडोलीकर) (वय ५५, रा. राजारामपुरी ९वी गल्ली) हे रात्री २ च्या सुमारास भरधाव वेगाने चारचाकीतून टेंबलाईनाका चौकाकडून टाकाळा चौकाकडे येत जाणाऱ्या रस्त्यावरून जात असताना हा अपघात झाला. अपघातात दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे.








