मग, मजेने करतात मद्यप्राशन
जगभरात असे अनेक लोक आहेत, ज्यांना मद्यपान अत्यंत पसंत आहे. अशास्थितीत लोक वेगवेगळ्या शैलीच्या मद्याचा आनंद घेत असतात. परंतु एका ठिकाणी मिळणारे मद्य पिणे प्रत्येकासाठी शक्य नाही. हे मद्य मानवी अंगठा कापून त्यात टाकून पिण्यासाठी दिले जाते. परंतु हे सर्वत्र मिळत नाही, तर केवळ एका रेस्टॉरंटमध्येच उपलब्ध आहे. या रेस्टॉरंटचे नाव सॉरडग सलून असून ते डाउनटाउन हॉटेलमध्ये आहे. हे हॉटेल उत्तर कॅनडाच्या डॉसन शहरात आहे. हॉटेलच्या या बारमध्ये तुम्हाला मानवी पायांचा अंगठा किंवा बोट मिसळलेल्या ड्रिंकचा आनंद घेता येतो. या स्पेशल ड्रिंकला सॉरटो कॉकटेल म्हटले जाते. डाउनटाउन हॉटेलमध्ये या बारमध्ये हे खास ड्रिंक सुमारे 50 वर्षांपेक्षा अधिक काळापासून प्यायला दिले जात आहे.
कापलेल्या अंगठ्याने युक्त मद्याची सुरुवात कशी झाली यामागे एक कहाणी आहे. अंगठ्याची कहाणी 1920 च्या दशकात सुरू हेते. त्यादरम्यान लुई अणि ओट्टो नावाचे दोन भाऊ मद्याची तस्करी करत होते. तस्करीदरम्यान एकदा दोन्ही भाऊ बर्फाळ वादळात अडकून पडले. अतिथंडीदरम्यान लुईच्या पायाचा अंगठा शीतदंशाचा शिकार झाला. त्यात घाव तयार झाल्याने तो बर्फाने गळू लागला. ओट्टो स्वत:च्या भावाची ही स्थिती पाहून त्रस्त झाला. अंगठ्यातून पूर्ण पायात संक्रमण फैलावेल असे त्याने वाटले. मग त्याने स्वत:चा भाऊ लुईच्या पायाचा अंगठा कापून वेगळा केला. जिवंत परतल्यावर दोन्ही भावांनी तो अंगठा जपून ठेवण्याचा निर्णय घेतला. याचमुळे त्यांनी तो मद्यात ठेवून दिला. यामुळे अंगठा पूर्णपणे सुरक्षित होता.
जहाजात वर्षांपासून हा अंगठा तसाच ठेवण्यात आला, कुणालाच याची माहिती नवहती. लुई आणि ओट्टोs यांचा मृत्यूही झाला. परंतु सुमारे 50 वर्षांनी कॅप्टन डिक स्टीवेंसन यांना केबिनची सफाई करताना हा अंगठा मिळाला, तो घऊन ते डाउनटाउन हॉटेलमध्ये आले, तेव्हापासूनच मद्यात अंगठा मिसळवून मद्य पिण्याचा प्रकार सुरू झाला. परंतु हे नेमके कधी सुरू झाले हे कुणाला ठाऊक नाही. परंतु लोकांदरम्यान अशाप्रकारे मद्यपान करण्याची व्रेझ वाढतच गेली.
अनेकदा हा अंगठा चोरीलाही गेला. परंतु तरीही हॉटेलकडे अंगठ्याची कमतरता कधीच निर्माण झाली नाही. हॉटेलकडे अंगठे अन् बोटांचा साठा असतो. हे अवयव ग्राहकांकडून त्यांना दानाच्या स्वरुपात मिळतात. हॉटेलला आतापर्यंत अशाप्रकारे 10 अंगठे आणि बोटं मिळाली आहेत. परंतु यातील 8 एक तर चोरीला केली किंवा कुणीतरी गिळली आहेत. पूर्वी प्रत्येकजण अंगठा तोंडात पकडायचा. परंतु जेव्हा गिळण्याची बाब समोर आली तेव्हा तो तोंडात धरण्यास मनाई करण्यात आली.
दंडाची तरतूद
बंदी असूनही जर कुणी मद्यासाब्sात अंगठा तोंडात गिळत असेल तर त्याला हॉटेलने दंड ठोठावण्यास सुरुवात केली. प्रारंभी याकरता 30 हजार रुपयांचा दंड होता. परंतु 2013 मध्ये एका ग्राहकाने ड्रिंक संपविले आणि अंगठा जाणूनबुजून गिळला आणि शांतपणे दंड भरून निघून गेला. या घटनेनंतर दंडाची रक्कम वाढवून दीड लाख रुपये करण्यात आली. तर 2017 मध्ये एका इसमाने या अंगठ्याचीच चोरी कली. पोलिसांनीही त्याचा शोध घेतला, परंतु तो मिळाला नाही. हॉटेलकडे आणखी अंगठे असल्याने सॉरटो कॉकटेल जारी आहे. तर जो ग्राहक ड्रिंकमध्ये मिळालेल्या अंगठ्याला ओठांनी स्पर्श करतो, त्याला हॉटेलकडून एक प्रमाणपत्र दिले जाते.









