सातारा / विशाल कदम :
राजधानी सातारा एका बाजूला विकासाच्या दृष्टीने कात टाकतोय परंतु दुसऱ्या बाजूला सातारकरांचा जीव कबड्डीमोल झाला आहे. कधी, कसा, कुठे, कोण अंगावर येईल याचा नियम नाही. क्षणात चालणाऱ्याचा सुद्धा जीव जावून त्याचे कुटुंब उघड्यावर पडतेय. बेशिस्तीत गाळ्या चालवणे, रस्त्याच्या कडेने बाटलेली दुकाने, पथारीवाले, रिक्षावाल्यांचा तोरा निराळाच झालाय, कसेही, कोठेही आणि कधीची रिक्षावाला आडवा तिडवा येत असल्यामुळे कायद्याचा धाकच कोणाला नसल्याने एका आठवड्यात बेशिस्तीमुळे दोन जणांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. वाहतुकीचे नियम बासणात बांधल्यामुळे सातारकर जीव मुठीत घेऊन फिरत आहेत. सातारा शहर विस्तारत आहे. मात्र, शहरातील रस्ते त्याच रुंदीचे आहेत. उलट पथारीवाले, दुकानदारांची अतिक्रमणे यामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. त्यातच कशाही पद्धतीने लावण्यात येणारी वाहने, नियमाची पायमल्ली करत कोणीही कुठुनही बाहन दामटणे यामुळे अपघाताची संख्या बाढत आहे. शहर पोलीस ठाणे आणि शाहुपूरी पोलीस ठाणे या दोन्ही पोलीस ठाण्याकडे आठवङ्ख्यामध्ये सुमारे तीन ते चार घटनांची नोंद होते. एकाच आठवडयात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन घटनांची नोंद झाली असून त्यामध्ये शाहुनगरात रामराव पवार नगरात रस्ता मोकळा असताना भरधाव निघालेल्या कार चालकाने बुलेट चालकास धडक दिल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर सिव्हील हॉस्पिटलच्या परिसरात हाँ टेलचा व्यवसाय करणारे राकुसलेवाडी येथील माजी सैनिक हे नुकतेच नातेवाईकांना भेटून दुचाकीवरुन गेले होते. तोच स्टॅण्ड परिसरात त्यांचा ट्रॅकच्या चाकाखाली सापहून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता बुधवारी सकाळीच कारने एका पायी चालत जाणाऱ्या महिलेचा बळी घेतला गेला. त्यामुळे सातारा शहरात पायी चालत जाणारा सातारकर सुद्धा सुरक्षित नाही, अशी भावना सातारकरांची बनली आहे.
- गोडोली चौकात सुद्धा वाहतूक कोंडी
गोडोली चौकात सुद्धा बाहतूक कोंडी नित्याची होत असते. तिथे रस्त्यात मध्येच कराह बाजूकडे जाणारे प्रवाशी बसची प्रतिक्षा करत असतात. सुसाट बाहन धारक वाहतूक कोंडीतून पुढे जाण्याच्या तयारीत असतात. तर एखादी बस प्रवाशी घेण्यासाठी बांबलेली असते. तेथेही अपघात होण्याची शक्यता आहे. या चौकात एकाने जरी आडवी गाडी मारली की किमान १५ मिनिटे वाहतूक कोंडी सुटत नाही हा नित्यक्रम होवून बसलाय जुन्या दवाखान्याच्यासमोर अपघात पॉईंट जुन्या दवाखान्याच्या समोर पाईपलाईनचा व्हॉल्व्ह आहे. त्यात बरोबर दुचाकी आदळून अपघात होण्याची शक्यता आहे. अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. तसेच कमानी हौदाच्या चौकात सुद्धा दोन्ही बाजूने सुसाट बाहने जात असतात. त्यात अचानक गुरुवार बागेकडून किंवा पाचशे एक पाटीकडून बाहन येताच अपघात घडतो. देवी चौकात तर कॉलेज, शाळा, डॉस्पिटल असल्याने तेथे सतत गर्दी असते. त्या चौकात सुद्धा अचानक कोणतीही गाडी कुठूनही येत असते. पुढच्या मारवाडी चौकात तोच प्रकार होतो .
- आकार हॉटेलच्या पुढे राहतोय यमदूत…!
वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित यादव यांचे शिस्त लावण्याचे प्रयत्न नित्यनियमाने सुरु असतात. परंतु त्यांच्या नियमाला खिशात ठेवून रस्त्यावर भाजी विक्री करणारे (शेतकरी नव्हे) रस्त्याच्या मध्येच यायचे बाकी राहिलेत. त्यांच्यामुळे खरेदीसाठी ग्राहक भाजी घेण्याच्या नादात असतात. परंतु पोवईनाक्यावरुन तीव्र उतारावरुन अरुंद रस्त्यावरुन येणारे वाहन कधी कोणाला बरोबर घेऊन जाईल याचा नेम नाही. त्यामुळे येथे यमदूत मुक्कामालाच आहे, असा भास नेहमीच होत असतो. त्याचबरोबर कमी म्हणून की काय रिक्षावाल्यांनी येथे जणू काही थांबाच केला आहे. वाहतूक शाखेचे गाडी आली की पळून जाणे हा त्यांचा नित्यक्रम आहे. अगोदरच रस्ता लहान, त्यात विक्रेत्यांची रस्त्यावर पथारी आणि रिक्षावाल्यांची लुहवुड हा अपघातास कारणीभूत ठरत आहे.
- राजवाड्यावर चाँदणी चौकात सगळाच खेळ
राजवाड्यावर चौदणी चौकात अलिकडे भाजी विक्रेतेही वाढलेले आहेत. फुटपाथवर बसत होते आता नगरवाचनालयाच्या समोर बसतात, तर काही भाजी विक्रेत्यांच्या गाठ्या या राजवाडा बसस्थानकाच्या समोर लागलेल्या असतात. त्यामुळे समर्थ मंदिरकडून येणाऱ्या वाहनांना मंगळवार तळयाकडून येणारी बाहने दिसत नाहीत, किंवा तळ्याकडे जाणाऱ्या वाहनांना समोरच वाहन दिसत नाही.
- प्रत्यक्ष अपघात पहायचाय… अर्धा तास शिवतीर्थ परिसरात थांबा…
अपघात का होतात याचे कारण पहायचे असेल तर वेळ काढून पाच मिनिटे शिवतीर्थ परिसरात थांबा म्हणजे समजेल. तहसील कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारी वाहने, शिवतीर्थाला वळसा मारुन बाढे फाटा मार्गे जाणारी वाहने तर काही वाहने डी सिव्हिलमार्गे आलेली उलटी स्टॅण्डच्या रोडकडे निघालेली असतात. त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर पोलीस मुख्यालयाकडून आलेली वाहने, राजवाक्याकडून आलेली वाहने आणि कराह बाजूकडून आलेली वाहने यांचा एकत्र संगम शिवतीर्थाच्या लगत होतो. तेव्हाही ज्या कोणाला गडबड असते. त्यामुळेही अपघात होण्याची शक्यता असते. त्यातच बळबताना अपघात होण्याची भीती असते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोरही अपघात प्रवण क्षेत्र आहे. तेथे स्पीड ब्रेकरची गरज आहे.








