कोकरूड :
येळापूर (ता. शिराळा) येथील बसस्थानकावर मोटार सायकल आणि डंपर यांच्या धडकेत दुचाकीवरील दोन्ही युवक जागीच ठार झाले. ही घटना बुधवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास घडली असून घटनेचा गुन्हा कोकरुड पोलिसात दाखल झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गवळेवाडी येथील सादिक नारायण यादव (वय 45) आणि किसन विष्णु यादव (वय 35) हे बुधवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास गवळेवाडीहून मोटार सायकल क्रमांक (एम एच.-03 बी एल 5315) ने शेडगेवाडीकडे जात होते तर याच सुमारास चांदोली धरण–शेडगेवाडी रोडचे चालू असलेले कामावर-(एम एच -10.झेड 4865) डांबर वाहतूक करणारा डंपर डांबर खडी आणण्यासाठी वाकुर्डेचे फाट्याकडे वळत असताना त्याचे पुढील चाकाजवळ डाव्या बाजूला धडक बसल्याने दुचाकी चालक मोटार सायकलवरील सादिक यादव आणि किसन यादव यांचे डांबरी रस्त्यावर डोके आदळल्याने दोघे जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच कोकरुड पोलिसानी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे.








