सांगली :
सध्या वाळू मिळत नाही. अशातच वाळूने भरलेला डंपर सांगलीतील भर चौकातून दिवसाढवळ्या लंपास करण्यात आला आहे. आमराई रस्ता परिसरात लावलेला हा वाळूने भरलेला डंपर चोरट्याने चोरून नेला आहे. ही चोरी दि. 13 फेब्रुवारी सकाळी 10 ते दि. 10 मार्च 2025 या कालावधीत घडली. याबाबत गणेश संपतराव पवार (रा. गणपती मंदिरानजीक, विश्रामबाग, सांगली) यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
घटनेची माहिती अशी, फिर्यादी गणेश पवार हे ग्राम महसुल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी दोन ब्रास वाळू भरलेला डंपर (क्र. एमएच 09 जीजे 8959) आमराई रस्त्यानजीक असणाऱ्या आमराई क्लब समोरील रस्त्यावर लावला होता. चोरट्याने तो डंपर लंपास केल्याचा प्रकार त्यांच्या 10 रोजी सायंकाळच्या सुमारास लक्षात आला. यामध्ये फिर्यादी गणेश पवार यांचे 2 लाखाचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.








